धाराशिव (जिमाका)– जिल्ह्यात जून ते सप्टेंबर २०२५ या काळात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात मोठी हानी झाली आहे.जिल्ह्याची पावसाची वार्षीक सरासरी ६०३.१० मि.मी.पावसाची असताना तुलनेत तब्बल ९७३.७ मि.मी. पाऊस झाला आहे.म्हणजेच १६१ टक्के इतका पाऊस पडला आहे.या विक्रमी पावसाने शेतकरी,नागरिक,पायाभूत सुविधा,पशुधन आणि दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूरामुळे आतापर्यंत ८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.यात धाराशिव-१,परंडा-१, भूम-२,उमरगा-१,लोहारा-१ आणि कळंब-२ व्यक्तींचा समावेश आहे.पशुधन व घरांचे नुकसान झाले आहे.४०६ पशुधन वाहून गेले (मदत – ४६.४९ लाख),३२०६ घरांचे नुकसानीची मदत म्हणून १ कोटी ४१ लक्ष ३३ हजार रुपये पात्र ३१४९ कुटुंबांपैकी १,७८१ कुटुंबांना तातडीची मदत वाटप करण्यात आली आहे. २१ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील ७३७ गावे बाधित झाली.४ लक्ष ३३ हजार शेतकरी प्रभावित झाले. त्यांचे जिरायत क्षेत्र – ४ लक्ष २५ हजार ७२८ हेक्टर,बागायत क्षेत्र – २१ हजार ५२० हेक्टर व फळपिके – २,४३२ हेक्टर असे एकूण ४ लक्ष ४९ हजार ६८१ हेक्टर क्षेत्र पुराच्या पाण्याने बाधित झाले आहे. जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीची मदत म्हणून शासनाकडून १८९ कोटी ६० लक्ष ६७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.यामध्ये २ लक्ष ३४ हजार ९९५ शेतकरी असून ५९ हजार ४७३ शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.तर ५१ कोटी २८ लक्ष ९७ हजार रुपये रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. ईवायसी करणे बाकी असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ४७ हजार ८६० इतकी आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची देखील हानी झाली आहे.यामध्ये २२१ रस्त्यांचे नुकसान अंदाजे १२,७६० लाख रुपयांचे आहे.१४६ पूल बाधित झाले असून अंदाजे ८ कोटी ६३ लाख रुपयांचे नुकसान तर १९ तलावांचे नुकसान झाले असून नुकसानीची किंमत अंदाजे ३ कोटी ८ लाख रुपये इतकी आहे.२,३९८ विजेच्या खांबाचे नुकसान झाले असून नुकसानीची किंमत ६ कोटी ३५ लाख रुपये इतकी आहे.जि.प. पंचायत समिती व सार्वजनिक विभागाच्या ५१ इमारतींचे नुकसान झाले आहे.इतर नुकसानग्रस्त इमारतींची संख्या २९० इतकी आहे. १४ ते २६ सप्टेंबर दरम्यान झालेल्या पुरामुळे जिल्ह्यात तब्बल १ हजार ६८३ विहिरींचे नुकसान झाले आहे. यामध्ये भूम (८४०) व परंडा (६३६) तालुके सर्वाधिक बाधित झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जगण्याचा आधार असलेल्या विहिरी मोठ्या प्रमाणात क्षतीग्रस्त झाल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पूर परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात बचाव मोहीम राबवली.या मोहिमेतून ३ हजार ९५७ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.३९३७ नागरिक स्वतःच्या घरात/नातेवाईकांकडे परतले असून २० नागरिक अद्याप निवारागृहात आहेत.पशुधनासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे मुरघास उपलब्ध असून त्याचे वाटप सुरू आहे.या आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकरी,कुटुंबे आणि सर्वसामान्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले असले तरी जिल्हा प्रशासनाकडून मदतकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
More Stories
निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक