धाराशिव (जिमाका) – जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे उभ्या राहिलेल्या संकटाच्या काळात शासकीय मदतीबरोबरच अनेक स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्ती पूरग्रस्तांच्या मदतीला धावल्या आहेत.विविध पुराने बाधित गावांमध्ये अन्नधान्य,किराणा साहित्य,पशुखाद्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. धाराशिव तालुक्यातील भंडारवाडी,इर्ला व तेर येथे ज्ञानप्रबोधिनी (हराळे) संस्थेकडून ११६ किट वाटप झाले.पाडोळी येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ४५ किट वाटप करण्यात आले.तर बायफ संस्थेने १०० पशुपालकांना जनावरांसाठी खनिज मिश्रण दिले. पूरामुळे बाधित भूम तालुक्यातील झालेल्या ३२ गावांना पुण्यातील मराठवाडा युवा मंच संस्थेने ३५० किट दिली.तसेच श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना,शिरोळ यांचेकडून ३०० किट पुरवण्यात आल्या. परंडा तालुक्यातील २५ गावांना पंधरा स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींकडून तब्बल ३३,०४४ किलो अन्नधान्याचे वाटप झाले. याशिवाय आ.प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी चिंचपूर,पांढरेवाडी,रोहकल, हिंगणगाव,भोत्रा,ढगपिंपरी,शेलगाव व लोहारा या गावांमध्ये किराणा साहित्याचे किट वाटप केले. वाशी तालुक्यातील जानकापुर गावात स्वयंसेवी संस्थेकडून धान्यकिटचे वाटप करण्यात आले.पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासनासोबतच समाजातील विविध संस्था आणि व्यक्ती पुढे येत असल्याने पुरबधित कुटुंबाना दिलासा मिळत आहे.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान