विद्यार्थ्यांमध्ये बचतीची सवय व आर्थिक शिस्त जोपासण्याचा उपक्रम
कळंब – विद्यार्थ्यांना बचतीचे महत्त्व समजावे तसेच गरजेच्या वेळी त्यांना स्वतःच्या बचतीचा लाभ मिळावा,या उद्देशाने ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहा येथे ‘आदर्श बचत बँकेचे’ उद्घाटन नुकतेच करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेशभाऊ मोहेकर, पर्यवेक्षक सतीश कानगुडे सर, आर्थिक साक्षरता समूहाचे मार्गदर्शक प्रा.रोहित मोहेकर, तसेच समूह प्रमुख कु.प्रगती जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना प्रा.चंद्रशेखर गिरी यांनी बचतीचे महत्त्व पटवून दिले. सहशिक्षिका नीता सोनवणे यांनी बचत बँकेची निर्मिती व कार्यपद्धतीबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सानिका बाराखोते हिने केले, तर आभार प्रदर्शन सहशिक्षक सतीश मडके यांनी केले. या वेळी प्राचार्य अविनाश मोरे सरांनी बँकेची कार्यप्रणाली जाणून घेतली व विद्यार्थी कर्मचारी वर्गाचा सत्कार केला. त्यात – प्रणिता मडके – कॅशिअर,मधुरा मडके – मॅनेजर,सुजाता माळी – उचल विभाग,खुशी मडके – जमा विभाग,अक्षरा कोकाटे – रेकॉर्ड विभाग,भैया शिंदे – कर्ज विभाग,वैष्णवी मडके – शैक्षणिक कर्ज विभाग या विद्यार्थ्यांना विशेष गौरविण्यात आले. कार्यक्रमाला मार्गदर्शक शिक्षक ज्योतिराम सोनके, सहशिक्षिका श्रीमती उषा पांचाळ, प्रा. प्रतिभा सावंत, आर्थिक साक्षरता समूहाचे विद्यार्थी जय रणदिवे तसेच आदर्श बचत बँकेतील सर्व विद्यार्थी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
More Stories
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन
ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन