वेद शैक्षणिक संकुलात आयुध पूजन,दीक्षांत समारंभ व गुणवंत विद्यार्थी समारंभ उत्साहात संपन्न
कळंब – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने व प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ अध्यापक विद्यालय आणि भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयुध पूजन,दीक्षांत समारंभ व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ दि.३० सप्टेंबर २०२५ वार मंगळवार रोजी उत्साहात संपन्न झाला.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने होते.प्रमुख पाहुणे म्हणून लातूर महापारेषणचे उपकार्यकारी अभियंता सुहास फाटे,मुरूड उपकेंद्राचे उपकार्यकारी अभियंता मन्मथ गुजर,भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरज भांडे,मराठी विभाग प्रमुख प्रा.श्रीकांत पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे अभियंता सुहास फाटे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, “प्रखर इच्छाशक्ती,प्रामाणिक प्रयत्न, जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर कोणतेही यश मिळवणे शक्य आहे.प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःच्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून शून्यापासून सुरुवात करावी. मेहनत व सातत्य हेच यशाची गुरुकिल्ली आहे.”
तसेच प्रमुख पाहुणे अभियंता मन्मथ गुजर व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सतिश मातने यांनी गुणवंत प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रमाणपत्रे व पुरस्कार प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वकर्मा व सरस्वती देवीची पूजा करण्यात आली,तर कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने झाला.
कार्यक्रमात संस्थेतील २०२४–२५ शैक्षणिक वर्षातील पुढील गुणवंत प्रशिक्षणार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला :
या विद्यार्थ्यांचा झाला दीक्षांत समारंभ पाचभाई प्रणव, गाडे सुजल,साळुंके अजय वायरमन द्वितीय वर्ष :- पवार सार्थक,हिंगे निखिल,बोंदर अशिष,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सुरज भांडे यांनी केले. सूत्रसंचालन निदेशक अविनाश म्हेत्रे यांनी केले,तर आभारप्रदर्शन निदेशक राजकुमार शिंदे यांनी केले.
याप्रसंगी प्रा.सुकेशनी गव्हाणे,प्रा.मोहिनी शिंदे,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके, निदेशक बालाजी रामरुळे,आदित्य गायकवाड, दिक्षा गायकवाड,विनोद कसबे आदींसह प्रशिक्षणार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
More Stories
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव