मोहा (प्रविण कसबे) – कळंब तालुक्यातील मोहा परीसरासह तालुक्यात२६ सप्टें २०२५ रोजी सायंकाळपासून सतत रात्रंदिवस अतिमुसळधार धो-धो कोसळणाऱ्या तुफान पाऊसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.मात्र मोहा परीसरातील खामसवाडी,खेर्डा,बोर्डा बरमाचीवाडी,नागझरवाडी,दहिफळ,मंगरूळ या भागातील अनेक लहान मोठ्या नद्या ओढ्यांना महापूर आल्याने धोक्याची पातळी ओलांडल्याने उडीद,मूग ही तर पिके गेलीच परंतू, सोयाबीन,ऊस,केळी, कांदा हि पिके वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार महाभयंकर पावसाने जमीनदोस्त झाली असल्याने बळीराजा पार खचला आहे. यावर्षी मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाऊस सुरू झाला जुन,जुलै महिन्यातील नक्षत्रातही चांगला पाऊस झाला असल्याने मुग,उडीद कांदा व मुख्यत्वे करून नगदी पीक असणारे सोयाबीन पिकाचा मोठ्या प्रमाणात पेरा केला आहे. प्रसंगी खासगी सावकारांचे उंबरठे भिजवून उसनवारी व टक्केवारीचा आधार घेत शेतकऱ्यांनी महागड्या किटकनाशक,तननाशकाच्या फवारण्या केल्या.मात्र या सप्टेंबर महिन्यातील वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने बळीराजाच्या हातातोंडाशी आलेली पिके होत्याची नव्हती झाली.परीणामी शेतकरी राजांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले.यावर्षी तालुका व मोहा परीसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक लवकरच जुनच्या सुरूवातीलाच पेरा केल्याने चांगला भाव मिळेल ही आशा होती.मात्र काढणीला आलेल्या सोयाबीनच्या शेंगांना अंकूर येत असून या आसमानी संकट आल्याने बळीराजाची स्वप्ने करपून गेल्याने शेतकरीराजा मोडून गेला आहे.माञ या मोहा परीसरातील भागात एकही आमदार,खासदार, मंत्री, अधिकारी फिरकला सुद्धा नसल्याने हे मायबाप सरकार नुकसान भरपाई देणार की नाही? देणार असेल तर कधी देणार? अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
More Stories
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन
ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन