कळंब – आपल्या जीवनात आलेल्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपण सक्षम असले पाहिजे संकटाला,दुष्काळाला संधी समजूनच कार्य केल्यास जीवनात यशस्वी होता येते यासाठी आनंदी राहिले पाहिजे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करा असे विचार येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख डॉ.संदीप तांबारे यांनी कळंब येथे शासकीय मध्यवर्ती इमारत सभागृहात दि.२६ सप्टेंबर २०२५ रोजी स्वयंशिक्षण प्रयोग संस्था आयोजित तालुकास्तरीय महिला संवाद कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना व्यक्त केले. याप्रसंगी डॉ.संदीप तांबारे यांनी टेन्शन फ्री व व्यसनमुक्त रहा असा सल्ला दिला व नवरात्रामध्ये घटस्थापना करण्याचा उद्देश बियाणाची उगवण क्षमता तपासणे हा होता, यामागे विज्ञान आहे. महिलांनी शेतीचा शोध लावला असे सांगितले व महिलांचे हक्क,अधिकार,याविषयी सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी मंचावर कृषी आत्मा विभागाचे टेकाळे,पत्रकार माधवसिंग राजपूत,सामाजिक कार्यकर्ते सचिन क्षिरसागर,ॲड. कांबळे, मातोश्री तांबारे,स्वाती भातलवंडे,शेतकरी महिला व VAG (व्हिलेज ॲक्शन ग्रुप) लीडर्सनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.संदीप तांबारे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. याप्रसंगी कृषी आत्मा विभागाचे टेकाळे यांनी आत्म विभागाच्या विविध योजना यामध्ये नैसर्गिक राष्ट्रीय शेती मिशन,पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या योजनेबद्दल व याचबरोबर शेतकरी गट स्थापन करणे याविषयी सविस्तर माहिती दिली.सचिन क्षिरसागर यांनी महिलांना जॉब कार्ड व व्यवसायाबद्दल मार्गदर्शन केले.पत्रकार माधवसिंग राजपूत यांनी महिला गृह उद्योग व उत्पादनासाठी मार्केट या बद्दल माहिती दिली.तसेच नैसर्गिक शेती याविषयी जनजागृती झाली पाहिजे.महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर बनावी यासाठी संस्थेचे कार्य स्तुत्य आहे असे सांगितले.या कार्यक्रमाच्या संयोजक दिलशाद तांबोळी यांनी एस.एस.पी बद्दल व महिला शेतकरी कंपनी बद्दल माहिती देऊन महिलांना मार्गदर्शन केले. ज्योती वाघ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले विल’ (WILL) चा उद्देश,पर्यावरणपूरक शेती, शाश्वत विकास,हक्क व अधिकार, तसेच पायाभूत नेतृत्व प्रशिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. या संवाद तालुका समन्वयक विजयमला शेंडगे यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले. कार्यशाळेसाठी मार्गदर्शन देवकन्या जगदाळे यांनी केल. त्याचबरोबर तालुका लीडर पूजा भवर,राधा डिकले,सारिका जाधव,ज्योती कुंभार,किस्किंदा मुळीक या सर्वांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. ‘या संवाद कार्यशाळेमुळे शेतकरी महिला व VAG लीडर्स यांना कृषी,उपजीविका योजना, मानसिक आरोग्य,तसेच सेंद्रिय शेतीविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली व थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
More Stories
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव
कळंब–ढोकी परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार