September 22, 2026

संभाजी ब्रिगेडची जिल्हा कार्यकारिणी पुनर्गठन बैठक

  • धाराशिव – संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हा कार्यकारिणीचे पुनर्गठन तसेच अतिवृष्टीमुळे बाधित भागाची पाहणी करण्यासाठी भूम येथील शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक रविवार,दि.२८ सप्टेंबर रोजी दुपारी १.०० वाजता पार पडणार आहे.
    या बैठकीस संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष व धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख आण्णासाहेब सावंत, प्रदेश प्रवक्ते प्रा.सुदर्शन तारख, प्रदेश संघटक अतुल गायकवाड व विभागीय अध्यक्ष ॲड.राहुल वायकर निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
    बैठकीदरम्यान संभाजी ब्रिगेडच्या धाराशिव (पश्चिम) जिल्हाध्यक्षपदासाठी मुलाखती घेण्यात येऊन नियुक्ती केली जाणार आहे.जिल्हाध्यक्ष पदावर कार्य करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी धाराशिव,कळंब,भूम व परंडा तसेच वाशी तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.तानाजी चौधरी यांनी केले आहे.

 

error: Content is protected !!