कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रासेयो दिन साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनातून घेण्यात आला. स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे महत्त्व यावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी म्हणाले, “ग्रामीण समाज,ग्रामीण परिसर, निसर्ग,संस्कृती,रुढी,प्रथा-परंपरा, ग्रामीण जीवन आणि ग्रामीण भागातील समस्यांची जाणीव व्हावी, त्या सोडवण्यासाठी उपाययोजना, श्रमसंस्कार, स्वावलंबन, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, सदाचार, स्वावलंबन, चारित्र्यसंवर्धन, व श्रमप्रतिष्ठा या विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजविणे. समाजाविषयी, राष्ट्राविषयी अभिमान निर्माण झाला पाहिजे तसेच त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास व्हावा या उदात्त हेतूने राष्ट्रपिता म. गांधी व पंडित जवाहरलाल नेहरु, माजी शिक्षणमंत्री डॉ. व्ही. के. आर राव यांच्या प्रेरणा आणि नेतृत्वातून २४ सप्टेंबर १९६९ राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झाली. असल्याचे मत मांडले.. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. संजय सावंत सर उपस्थित होते.”या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.राघवेंद्र ताटीपामुल यांनी केले व सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ. हेमंत चांदोरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा.अंकुशराव यांनी केले. या कार्यक्रमासाठी डॉ.अदाटे तसेच डॉ.समाधान चंदनशिवे सर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम पार पडण्यासाठी महाविद्यालयाचे अधीक्षक हनुमंत जाधव व बापू वाघमारे यांनी परिश्रम घेतले.
More Stories
“मोठ्या महादेवाचा मार्ग धोक्यात!” — पुरात वाहून गेला रस्ता-पूल; चैत्र एकादशीपूर्वी दुरुस्तीची शिवभक्तांची आर्त मागणी
“रस्ते की मृत्यूचे सापळे?” — अतिक्रमणखोर मोकाट,प्रशासन झोपेत;कळंबमध्ये महिलेचा चिरडून मृत्यू
तात्यासाहेब सोनवणे यांना ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’”