February 8, 2026

मोहेकर महाविद्यालयात “स्वच्छता ही सेवा” अभियानांतर्गत परिसर स्वच्छता मोहीम.

  • कळंब – भारत सरकार,युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय,उच्च व तंत्र शिक्षण विभाग,महाराष्ट्र शासन आणि शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय येरमाळा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने “स्वच्छता ही सेवा अभियान – २०२५” अंतर्गत परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
    हा उपक्रम अंत्योदय दिवस तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त “एक दिन – एक घंटा – एक साथ” या राष्ट्रस्वच्छता अभियानाच्या घोषवाक्याखाली पार पडला. या निमित्ताने महाविद्यालय व परिसर स्वच्छ करण्यात आला.
    या कार्यक्रमासाठी ज्ञानप्रसारक मंडळ,येरमाळा चे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत भगवान यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. ताटीपामुल यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. ते पुढे म्हणाले की, “प्लास्टिक व कॅरीबॅगचा वापर कमी केल्यास पर्यावरण संवर्धनास मोठी मदत होईल.”
    रोसेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ. हेमंत चांदोरे व प्रा.एन.एम. अंकुशराव यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या स्वच्छता मोहिमेत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे अधीक्षक हनुमंत जाधव व सहाय्यक ग्रंथपाल अरविंद शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
error: Content is protected !!