कळंब (राजेंद्र बारगुले) – “आजच्या विद्यार्थ्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्यासारखे विचारवंत, राजकारणी व कुशल संघटनकार बनले पाहिजे,” असे प्रतिपादन भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.श्रीकांत पवार यांनी केले. धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने आणि वेद शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरज भांडे यांनी भूषविले. या प्रसंगी प्रा.सुकेशनी गव्हाणे,प्रा.मोहिनी शिंदे,निदेशक राजकुमार शिंदे,निदेशक बालाजी रामरुळे,आदित्य गायकवाड,दिक्षा गायकवाड,विनोद कसबे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अविनाश घोडके यांनी केले,तर आभार प्रदर्शन निदेशक अविनाश म्हेत्रे यांनी मानले.कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी व छात्राध्यापकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी