वेद शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांना संवेदनशीलतेचा संदेश
कळंब – जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण विभाग,धाराशिव यांच्या आयोजनातून तसेच धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने व प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी लिंगसमभाव कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्ता दीक्षा शेख (तृतीयपंथी) यांनी दुपारच्या सत्रात अध्यापक व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या प्रभावी भाषणातून त्यांनी समाजातील लिंगभेद, तृतीयपंथीयांना समाजाकडून मिळणारी वागणूक,त्यांना भेडसावणाऱ्या समस्या व त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक असमानता यावर सखोल चर्चा केली. त्यांनी विद्यार्थ्यांना लिंगसमभावाची गरज पटवून दिली तसेच सर्वांना संवेदनशील व जबाबदार नागरिक म्हणून समाजासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी प्राचार्य सुरज भांडे,प्रा. श्रीकांत पवार,प्रा.सुकेशनी गव्हाणे,प्रा.मोहिनी शिंदे,प्रा. अविनाश घोडके,निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशक राजकुमार शिंदे,निदेशक बालाजी रामरुळे, आदित्य गायकवाड,दिक्षा गायकवाड,विनोद कसबे,सोनाली ढमाले आदी मान्यवर उपस्थित होते.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी