कळंब – दि.१७ सप्टेंबर २०२५ रोजी कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूलमध्ये मराठवाडा मुक्ती दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्राचार्य पवनकुमार कुलकर्णी यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी रामानंद तीर्थ आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी शाळेचे अध्यक्ष रवि नरहिरे,उपाध्यक्षा सौ.आशा नरहिरे यांनी उपस्थितांना मराठवाडा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सचिव प्रणव नरहिरे, शाळेतील सांस्कृतिक व क्रीडा विभागाचे सर्व शिक्षक उपस्थित होते.इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांनी या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून आपल्या भाषणांतून राष्ट्रपुरुषांच्या कार्याचे स्मरण करून दिले. तसेच हुतात्म्यांच्या बलिदानाची जाणीव करून देत मराठवाडा मुक्ती दिनाचा संदेश पोहोचविला. शिक्षकांनी कळंब येथील थोर स्वातंत्र्यसैनिक स्व.गणपतरावजी कथले यांचे योगदान तसेच मराठवाडा मुक्ती दिनाचा इतिहास याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वागतगीत व मराठवाड्याचे गौरवगीत सादर करून कार्यक्रमाला वेगळीच रंगत प्राप्त झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा विभागाचे सर्व शिक्षक,सांस्कृतिक विभागाचे शिक्षक–शिक्षिका वृंद, शाळेतील कर्मचारी व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचा समारोप झाला.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी