
- कळंब – कोणत्याही क्षेत्रात निष्ठापूर्वक व प्रामाणिक कार्य करणाऱ्या मोजक्याच लोकांमध्ये देव पण असते आणि अशाच देवमाणूस असणार्या पैकी सुखदेव टेकाळे यांनी निष्ठापूर्वक व प्रामाणिकपणे केलेल्या कार्याचा सत्कार होत असल्याचे गौरवोद्यगार अध्यक्षीय भाषणातून महादेव महाराज आडसूळ यांनी काढले.
प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्था व ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने पिंपळगाव (डोळा ) येथील शेकापचे निष्ठावंत कार्यकर्ते भाई सुखदेव (नाना) टेकाळे यांचा ७७ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.०० वाजता साक्षी कोचिंग क्लासेवर करण्यात आला. 
- या प्रसंगी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे, उपसंपादक माधवसिंग राजपूत, सेवानिवृत्त शिक्षक श्यामसुंदर शामसुंदर पाटील,पत्रकार परमेश्वर खडबडे आदींनी शुभेच्छापर मनोगतातून नानांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला.

या कार्यक्रमाच्या प्रस्तावनातून प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सा.साक्षी पावनज्योत संपादक सुभाष घोडके यांनी नानांचा जन्म मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशीच झाला असल्याने अन्याय विरुद्ध पेटून उठण्याचे आणि प्रामाणिक कार्य करण्याचे बाळकडू मिळाले असल्याचे सांगून सामाजिक व राजकीय कार्य तरुणांना प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे बहारदार असे सूत्रसंचालन व आभार संस्थेचे सचिव प्रा.अविनाश घोडके यांनी केले.




More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन