February 8, 2026

तुळजापूर तालुक्यात भाजपला धक्का; ऋषिकेश मगर व निम्न तेरणा संघर्ष समिती प्रमुखांसह असंख्य पदाधिकारी शिवसेनेत

  • धाराशिव – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे.माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र तथा जिल्हा बँकेचे संचालक सुनील चव्हाण भाजपमध्ये प्रवेशल्यानंतर नाराज झालेल्या कार्यकर्त्यांचा मोठा गट काँग्रेसचे युवक नेते ऋषिकेश मगर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आला. या गटाने भाजपमध्ये न जाता थेट मुंबईतील मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.
    या प्रवेश सोहळ्यात खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य सरपंच, माजी सरपंच, बाजार समिती संचालक आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे सेनेवर विश्वास व्यक्त केला.
    या प्रसंगी काटीचे सरपंच सुजित हंगरकर,वडगाव काटीचे सरपंच गौरीशंकर कोडगिरे,उद्योजक मोहन जाधव,वाडीबामणीचे उपसरपंच अमर माने,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामचंद्र ढवळे,कोरेवाडीचे सरपंच कोकरे, वडगाव लाखचे सरपंच बालाजी चंदनशिवे,माजी सरपंच दिलीप सावंत,शहाजी देवगुंडे,काक्रंबाचे माजी सरपंच प्रभाकर घोगरे, माजी सरपंच मदने,सावरगावचे ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब काडगावकर,जळकोटचे उपसरपंच प्रशांत नवगिरे,स्वप्निल शिंदे,उपसरपंच मनोज गायकवाड यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
    कार्यक्रमाला जिल्हा शिवसेना समन्वयक श्याम पवार,जिल्हा संघटक राजअहमद पठाण, उपजिल्हाप्रमुख जितेंद्र कानडे, जगन्नाथ गवळी,शहर प्रमुख राहुल खपले,बाळकृष्ण पाटील,माजी शहर प्रमुख सुधीर कदम,शहर संघटक अर्जुन साळुंखे,चेअरमन सुनील जाधव,चेतन बडगर, बालाजी पांचाळ,कृष्णात मोरे, अनिल छत्रे,नवनाथ जगताप यांच्यासह तुळजापूर तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • निम्न तेरणाचे लढवय्येही शिवसेनेत
  • धाराशिव येथील निम्न तेरणा संघर्ष समितीचे प्रमुख जगदीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोविंद गरड, विक्रम भोसले, बाळासाहेब पाटील, निखिल वाघमारे आदींनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.
    या वेळी शिवसेनेचे पदाधिकारी मुकेश पाटील,खंडू शिंदे,दत्ता चव्हाण,नेताजी गायकवाड, अश्विन पाटील,सुभाष कळसुले, बालाजी सगट,महादेव ढोले,चंदू ताकमोगे,सुधीर गायकवाड, पल्लव पाटील,जैनुद्दीन सय्यद आदी पदाधिकारी उपस्थित होते.
error: Content is protected !!