मोहा (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा) – ज्या काळात शिक्षणाच्या संधी उपलब्ध नव्हत्या,त्या काळात मोहेकर गुरुजींनी शिक्षणसंस्था उभारून ग्रामीण भागात ज्ञानदीप प्रज्वलित केला.आज आपल्याकडे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. येणाऱ्या काळात शिक्षण क्षेत्रात ‘मोहा पॅटर्न’ निर्माण व्हावा हीच आमची इच्छा असून,त्यासाठी सर्व शिक्षकांनी झोकून देऊन ज्ञानदानाचे कार्य करावे.गरज लागेल त्या प्रत्येक ठिकाणी मोहेकर उद्योग समूह सदैव पाठीशी उभा राहील.”असे प्रतिपादन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोहेकर उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत (तात्या) मडके यांनी केले. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड,मोहा यांच्या वतीने मोहा येथे आयोजित दि.१५ सप्टेंबर २०२५ वार सोमवार रोजी आयोजित कार्यक्रमात केले.
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील दहावी,बारावी,विविध स्पर्धा परीक्षा व क्रीडा क्षेत्रात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी विद्यालयाला आवश्यक असणाऱ्या क्रीडा साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते वाटपही करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्ञान प्रसार मंडळाचे प्रशासकीय अधिकारी रमेश मोहेकर होते. प्रमुख उपस्थितीत ज्ञान प्रसार मंडळाचे सचिव डॉ.अशोक मोहेकर, मोहेकर उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत मडके, विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे, केंद्रप्रमुख अशोक डिकले,जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका जेमिनी भिंगारे, मोहाचे मंडळ अधिकारी मुंडे, समाजसेवक सुफी सय्यद,मोहेकर ॲग्रोचे कार्यकारी संचालक डॉ.संतोष मडके,मोहेकर उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल मडके,मंडळ अधिकारी नारायण नागटिळक, राजकुमार जावळे,ह.भ.प.अशोक मडके,हनुमंत मडके,सलीम मोमीन,व्यवस्थापक फुलचंद मडके,दिलीप झोरी यांच्यासह मोहेकर मल्टीस्टेटचे सर्व अधिकारी,विद्यार्थी,पालक व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहेकर मल्टीस्टेटचे मुख्य अकाउंटंट इम्रान शेख यांनी केले. प्रास्ताविक शेखर गिरी यांनी केले तर आभार प्रदर्शन सतीश मडके यांनी मानले.
More Stories
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना भावपूर्ण अभिवादन
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन
ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन