February 8, 2026

“बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा देशभर पेटवू” – भंते विनाचार्य

  • लातूर (साक्षी पावन ज्योत वृत्तसेवा)- महाबोधी महाविहार मुक्त होईपर्यंत आमचा संघर्ष अखंड चालू राहील.हा लढा केवळ बिहारपुरता मर्यादित नसून भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रत्येक धम्मनिष्ठ उपासकाचा आहे. महाबोधी महाविहार हे जागतिक धरोहर स्थळ असून त्याचा ताबा बौद्ध समाजाकडे असणे ही इतिहासाची व न्यायाची मागणी आहे.जोपर्यंत या पवित्र स्थळाचा खरा वारसदार आपल्या योग्य स्थानावर विराजमान होत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष अखंड सुरू राहील.असे प्रतिपादन बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भंते विनाचार्य यांनी आपल्या प्रखर भाषणात केले.
    बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी काढण्यात आलेली ६०० फूट लांबीची आहे अविस्मरणीय पंचरंगी धम्मध्वज महारॅली हजारो उपासक–उपासिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने दिमाखदारपणे लातूर शहरात पार पडली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क या मार्गावर निघालेल्या या महारॅलीने संपूर्ण वातावरण आध्यात्मिक,प्रेरणादायी व ऊर्जावान केले.
    भंतेनी पुढे स्पष्ट केले कि“महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा ज्वलंत लढा आता देशभर उभारला जाईल.सम्राट अशोकांनी जसा धम्मराज्याचा पाया घातला, तसाच आपण सर्व ही आधुनिक भारतात समता व बंधुभावाचा नवा इतिहास घडवू.महाराष्ट्रासह देशभरातील प्रत्येक राज्यात धम्मध्वज पदयात्रा तथा जनसंवाद कार्यक्रम आयोजन करून या चळवळीला राष्ट्रीय स्तरावर नेण्यात येईल. तथागत बुद्धांच्या वारशाची खरी परंपरा जगासमोर आणण्यासाठी आपण सर्वांनी एकमताने पुढे यावे लागेल.”असे आवाहन ही भंते यांनी केले.

  • या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड.प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
    ते म्हणाले की,दोन हजार पाचशे वर्षांपूर्वी याच ऐतिहासिक भारतभूमीवर तथागत गौतम बुद्धांनी मानवतेसमोर नवा जीवनमार्ग उजळून दाखविला.बुद्धगया येथील बोधिवृक्षाखाली त्यांनी ज्ञानप्राप्ती करून समता,अहिंसा आणि करुणेच्या अधिष्ठानावर आधारित धम्माची स्थापना केली.
    यानंतर सम्राट अशोकांनी बुद्धाच्या अमोघ संदेशाला आत्मसात करून अखिल भारतभूमीत धम्मचक्र फिरविले.स्तूप,स्तंभ आणि शिलालेखांच्या माध्यमातून सम्राटांनी तथागतांची शिकवण जनमानसापर्यंत पोहोचवली. म्हणूनच “भारत ही बुद्धांची भूमी” असल्याचा ठाम उच्चार वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.

  • या प्रसंगी कार्यक्रमाचे मार्गदर्शक पु.भिक्खू पय्यानंद थेरो म्हणाले कि धम्म हा फक्त काही उपासक–उपासिकांचा विषय नसून संपूर्ण समाजाचा शाश्वत मार्ग आहे. समता, बंधुता व करुणा या मूल्यांवर उभारलेली धम्म चळवळ जर खऱ्या अर्थाने लोकचळवळ झाली,तरच ती परिवर्तन घडवू शकेल.
    आजच्या विषमतावादी,अन्याय व अन्यायकारक व्यवस्थेविरुद्धचा सर्वात मोठा शस्त्र धम्मचळवळ आहे. बुद्धांनी दिलेला संदेश हा केवळ वैयक्तिक साधनेसाठी नसून सामाजिक परिवर्तनासाठी आहे. म्हणून प्रत्येकाने धम्मध्वजाखाली एकत्र येऊन या चळवळीला आपल्या जीवनाचा भाग बनवले पाहिजे.धम्म चळवळ ही लोकचळवळ झाली,तरच समता, स्वातंत्र्य व बंधुता यांचा नवा इतिहास घडेल.असे मार्गदर्शनपर वक्तव्य यावेळी केले.
    या प्रसंगी भिक्खू महाविरो थेरो, भिक्खू राहुल शाक्यपुत्र,भिक्खू बुद्धघोष,भिक्खू नागसेन बोधी थेरो,भिक्खू सुभूती थेरो,भंते बोधिराज,भंते अमरज्योती सह पूजनीय भिक्खू संघ उपस्थित होता.
    या महारॅलीत अबाल वृद्ध,युवक वर्गासह लहान बालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती विशेष आकर्षण ठरली.भावी पिढीने धम्मपथावर चालावे, धम्मध्वजाखाली वाढावे, ही प्रेरणा त्यांच्या सहभागातून साकार होत असल्याचे दृश्य सर्वांना भावले. या प्रसंगी राकेश धारगावे,डी.एस.नरसिंगे,केशव कांबळे,बसवंतप्पा उबाळे,सुशीलकुमार चिकटे,लक्ष्मण कांबळे,अतिश चिकटे,प्रा.बापू गायकवाड आदिनी आपापली मनोगते व्यक्त केली. या वेळी चंद्रकांत चिकटे,अशोक कांबळे, एम. एन, गायकवाड, अनंत लांडगे, सचिन गायकवाड, विश्वनाथ आल्टे,भीमराव चौदंते,संजय कांबळे,डॉ.सिद्धार्थ सूर्यवंशी,प्रा.लहू वाघमारे,डॉ. विजय अजनिकर,पांडुरंग अंबुलगेकर,सुनील कांबळे,संजय सोनकांबळे, ॲड.धम्मदीप बलांडे, साधूभाऊ गायकवाड,अतुल गायकवाड,रवी गायकवाड,विनोद कोल्हे,निलेश बनसोडे,सतीश कांबळे,विशाल वाहुळे,सिद्धार्थ, यशपाल कांबळे,ॲड.आनंद सोनवणे,राहुल डुमणे,सूर्यवंशी,आशा चिकटे, सुजाता अजनीकर,अखिल भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी तथा सदस्य,सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी, समता सैनिक दल, विविध सामाजिक संघटनेचे प्रमुख सह समाजातील अनेक प्रतिष्ठित मान्यवरासह हजारो उपासक-उपासिकांची लक्षवेधी उपस्थिति होती.

  • कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिलिंद धावारे, ज्योतीराम लामतुरे, उदय सोनवणे, सिद्धांत चिकटे, अनिरुद्ध बनसोडे, पंडित सूर्यवंशी, सह महाविहार धम्मसेवक ग्रुप च्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.
    सदरील संपूर्ण कार्यक्रम पू. भिक्खू पय्यानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. प्रास्ताविक प्रा.यू.डी.गायकवाड यांनी केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.देवदत्त सावंत यांनी केले;तर आभार प्राचार्य डॉ. दुश्यंत कटारे यांनी मानले.

error: Content is protected !!