September 24, 2026

वेद शैक्षणिक संकुलात महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

  • कळंब – समाजहिताची अनेक कार्य करणारे महान समाजसुधारक,लेखक अस्पृश्यता,जातिव्यवस्थेचं निर्मूलन,स्त्रियांना आणि मागासवर्गीयांना शिक्षण देणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १३३ व्या स्मृतिदिनानिमित्त दि.२८ नोव्हेंबर २०२३ रोजी धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने व प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील संभाजी नगरातील वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    याप्रसंगी भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सूरज भांडे,प्रा.श्रीकांत पवार,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके,प्रा.मोहिनी शिंदे,निदेशिका कल्याणी भराटे,निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशक विनोद जाधव,लिपिक आदित्य गायकवाड,विनोद कसबे आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!