मोहा – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ११ सप्टेंबर २०२५,गुरुवार रोजी ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे,संस्थेचे प्रशासकीय अधिकारी व ट्रस्टी रमेशभाऊ मोहेकर,पर्यवेक्षक सतीश कानगुडे तसेच उच्च माध्यमिक विभागाचे प्रा.सुनील साबळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या परिपाठाचे सादरीकरण इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी केले.यामध्ये कविता शुक्राचार्य भोंडवे,नंदिनी नारायण मडके,अनुष्का रमेश मडके, अंकिता महादेव मडके,अपूर्वा विजयसिंह गव्हाणे,अंकिता अनंत सावंत,गौरी आनंद माळी,क्रांती सुभाष काळे यांनी सहभाग घेतला. परिपाठाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वरी दयानंद मडके हिने केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य सहशिक्षक मंगलदास पवार यांनी केले,तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक सतीश मडके यांनी केले. या वेळी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना भावपूर्ण अभिवादन
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन
ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन