कळंब – लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज महायोग चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक,उपकेंद्र कळंब च्या वतीने दिनांक ४ ऑगस्ट रोजी दत्तनगर केंद्र येथे महायोग साधना पूर्वभ्यास तथा गुणवंत विद्यार्थी व शिक्षक सत्कारकार्यक्रम घेण्यात आला ,कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ह.भ.प. महादेव महाराज अडसूळ हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मकरंद पाटील कळंब शहरअध्यक्ष भारतीय जनतापार्टी,प्रकाश भडंगे (भाजपा) प्रा.विश्वासराव जाधवर महाराज,जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमात एमबीबीएस साठी पात्र ठरलेल्या गुणवंत विद्यार्थिनी जान्हवी महादेव खापे,व श्रावणी पांडुरंग टेळे हिचा सत्कार करण्यात आला तसेच भाट शिरपुरा येथील कै.भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालयाचे शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी प्रणव अमोल गायकवाड, आर्या दशरथ शिंदे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात दिनांक ५ सप्टेंबर शिक्षक दिन असल्याने मुख्याध्यापक सुरेश टेकाळे तसेच सेवानिवृत्त प्रा.विश्वासराव जाधवर, व शिक्षिका सुलभा बाभळे यांचा सत्कार करण्यात आला तसेच कार्यक्रमाचे संयोजक सेवा निवृत्त शिक्षक व उपकेंद्राचे (कार्यवाह ) कल्याण खापे व त्यांच्या पत्नी सिंधु खापे यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेव महाराज अडसूळ यांनी लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज न चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने साधना उपक्रम स्तुत्य आहे. सामाजिक व कौटुंबिक स्वास्थ्यासाठी ध्यानधारणा हा उत्तम पर्याय आहे असे सांगून विविध परीक्षेत यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना पुढील भावी जीवनातील यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या तर मकरंद पाटील यांनी केंद्राच्या माध्यमातून समाज उपयोगी व आध्यात्मिक उपक्रम राबविले जात आहेत यासाठी मदत करण्याचे तयारी असल्याचे सांगितले कार्यक्रमासाठी ट्रस्टचे अध्यक्ष नागनाथ डांगे, साधक इंदू जाधव, शिवदीप दीक्षित, रोशन दीक्षित, सुभाष देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्याण खापे यांनी सूत्रसंचालन माधवसिंग राजपूत यांनी व आभार ॲड.महादेव खापे यांनी मानले.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड