March 26, 2026

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर यांना भाटशिरपूरा येथे अभिवादन

  • कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या ३४ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री गुरुकृपा बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था, पिंपळगाव (डोळा) संचलित भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालय,भाट शिरपुरा (ता. कळंब) येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
    ज्ञानप्रसार व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी आयुष्यभर झटणारे ज्ञानदेव मोहेकर गुरुजी हे खऱ्या अर्थाने शिक्षण महर्षी होते. शिक्षकांना प्रेरणा देणारे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे आणि समाजामध्ये शिक्षणाचा दीप पेटविणारे त्यांचे कार्य आजही स्मरणात आहे.
    या प्रसंगी संस्थेचे सचिव बाळकृष्ण धस, मुख्याध्यापक सुरेश टेकाळे, सहशिक्षक एस. जी. सूर्यवंशी,बी.व्ही.ओव्हाळ,एच. ए. पानढवळे,एस.एस.डिकले तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी विनोद चाळक,विनायक शिंदे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
error: Content is protected !!