February 8, 2026

गावखेड्यातील संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या अजोड संघर्षाला सैल्युट.!

  • भारतीय जागरूक नागरिक म्हणा किंबहुना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून चांगल्याचं उदार अंतःकरणाने कौतुक;
    आणि वाईटावर धाडसाने बोट ठेवताना संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या अजोड संघर्षाला सैल्युटच करावा लागेल.! तथागत गौतम बुद्धांच्या भवतुं सब्बं मंगलम्, सर्वांचं चांगलं व्हावं या दिव्य संदेशाला उज्ज्वल करताना..
    खरं पाहिलं तर “मराठा-ओबीसी” आरक्षणाच्या वादात पडणं म्हणजे, बेगानी शादी में अब्दुला दिवाना ! हे ज्ञात असतानाही’आरक्षण परिवारातील मोठं भावंड या नात्याने आमच्या सारख्या सामाजिक अभ्यासकाला ‘राजकीय तमाशा’ बघणं पटत नसल्याने आम्ही तसं तटस्थपणे व्यक्त होत आलो आहे. रयतेचे जाणते राजे छ. शिवाजी महाराज,आरक्षणाच्या संकल्पनेचे जनक म.जोतीराव फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज आणि आरक्षणाला भारतीय संविधानाच्या दंड संहितेत बसविणारे मानवमूक्तीचे प्रणेते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या पाऊलखुणांवरून वाटचाल करीत असताना, कालपासून सोशल मीडियावर #आरक्षण होर्डिंग्ज मोठ्या प्रमाणावर फिरत आहेत. हे पाहून वाईट वाटलं.गुलाल पुरेसा नाही .अजून आरक्षण मिळालंही नाही तरी एवढं कशासाठी.,? हाच प्रश्न आमच्यासहित कोट्यावधी भारतीयांना पडतोय.! मती गुंग होत आहे.. पण आम्ही तसूभरही विचलित होणार नाही. कारण आम्हाला पूर्ण कल्पना आहे… मराठा सेवा संघाचे प्रवर्तक शिवश्री मा. पुरुषोत्तम खेडेकर यांना अभिप्रेत आसलेलं आरक्षणाचे स्वातंत्र्य.!,’स्वत:च्या धडावर स्वतःचे डोके’ बाळसं अजूनही धरलेलं नाही.हैद्राबाद गॅझेटचा पुरावा सर्वोच्च न्यायालयात सक्षम पुरावा साबित होईल का? नामकरण (आरक्षण) लवकर पूर्ण होवो ही कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा भावंडांसाठी मनोमन सदिच्छा! बाकी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून थांबणा-यांपैकी आम्ही नाही आहोत. ! आरक्षणाच्या प्रश्नावरची कारणमीमांसा करताना,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षण भारतीय संहिता ३४० कलम, अर्थात पहिला घास आपल्याला दिला.नंतर ३४२ सरनाम्यात.? ऐतिहासिक विचारवंत दिवंगत पंजाबराव देशमुख यांना स्मरून सांगतो,चांगल्याचं उदार अंतःकरणाने कौतुक आणि वाईटावर धाडसाने बोट ठेवत राहायला हवं असं आमचं स्वातंत्र्य म्हणा किंबहुना आरक्षण परिवारातील थोरलं भावंड ..या नात्याने अर्थात सजग पत्रकार या नात्याने नैतिक कर्तव्य पार पाडण्यासाठी आम्हाला संविधानाने पुरेसे अधिकार दिले आहेत.! नाही का.?
  • भवतु सब्बं मंगलम्.!जय संविधान !! जय भारत !!!
  • @ समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे, उपसंपादक सा.साक्षी पावनज्योत,सोशल मीडिया प्रमुख जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स, रूग्णहक्क संघर्ष संरक्षण समिती ठाणे !
error: Content is protected !!