कळंब – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त दि.३१ ऑगस्ट २०२५ रोजी कळंब शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत मित्रसाधना गणेश मंडळ येथे गणेश आरती व महाप्रसाद वाटप,कळंब वृद्धाश्रमात टीव्ही भेट,ज्येष्ठांना फळांचे वाटप तसेच पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सचिव,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा अध्यक्ष,कळंब तालुका काँग्रेस कमिटी पांडुरंग कुंभार यांनी केले होते.
कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हरीभाऊ कुंभार, काँग्रेस शहराध्यक्ष शशिकांत निर्फळ,सुभाष लाटे,वृद्धाश्रम संचालक गणेश जावकर,सुरेंद्र साळवी,भूषण देशमुख,शीलानंद शिनगारे,मल्लिकार्जून डिकले,रामेश्वर जाधव,अंगद बारगुले, भाऊ कुचेकर,राजेश पुरी,रोहन कोठावळे,रोहन कुंभार,चैत्यन कुंभार,विठ्ठल निंगुळे,कुलदीप गवळी यांसह अनेक गणेशभक्त,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी