February 9, 2026

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग स्मरणात ठेवा, शीलसंपन्न जीवन जगा – लक्ष्मण धावारे

  • कळंब – भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या आदेशान्वये कळंब तालुक्यातील देवधानोरा व लोहटा (पूर्व) येथे अनुक्रमे शुक्रवार व शनिवार रोजी वर्षावासानिमित्त धम्मप्रवचनांचे आयोजन करण्यात आले.
    या प्रवचन प्रसंगी जिल्हा संस्कार सचिव लक्ष्मण धावारे यांनी “विश्वरत्न परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग स्मरणात ठेवा,शीलसंपन्न जीवन जगा” हा प्रभावी संदेश दिला. त्यांनी सांगितले की,माणसाने शील व सदाचाराचे पालन केल्यासच जीवनाचा खरा अर्थ उमगतो.काम,क्रोध,मद,मोह,माया व मत्सर या षड्रिपूंपासून मुक्त झाल्याशिवाय शीलाचे पालन होत नाही.शीलामुळे मन-शरीरावर सकारात्मक परिणाम होतात, तर त्याच्या अभावामुळे दुष्परिणाम भोगावे लागतात.
    आजच्या यांत्रिक व विज्ञानयुगात सुखाने झोप हवी असेल, तर रागविरहित व दोषविरहित जीवनशैली अंगीकारणे आवश्यक आहे. बाबासाहेबांनी समाजासाठी आयुष्य समर्पित करताना स्वतःच्या घरदाराकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या चार मुलांचे अकाली निधन झाले, तरी ते समाजकार्यापासून कधीही डगमगले नाहीत. हा त्याग आजच्या तरुणांनी सदैव स्मरणात ठेवावा व “आज मी समाजासाठी काय करू शकतो?” याची जाणीव ठेवून कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
    या कार्यक्रमास देवधानोरा येथील ज्येष्ठ नागरिक धर्मा वाघमारे, भीमराव दादा वाघमारे, बंकट तात्या वाघमारे, अंकुश वाघमारे, चोकोबा वाघमारे, सुबोध टोपे, हिम्मत वाघमारे, सुनील वाघमारे, राहुल वाघमारे, जयदेव वाघमारे, सुरज वाघमारे, आकाश वाघमारे, सुरज गायकवाड, तसेच गोविंदपूर येथील लहू हिंगे,वंदना वाघमारे, विजूबाई वाघमारे,सत्वशीला वाघमारे, सुनीता वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
    तर लोहटा (पूर्व) येथील ग्राम शाखा अध्यक्ष रुकसेन ढगे,हनुमंत ढगे,सिद्धार्थ टोपे,बापू टोपे,प्रकाश ढगे,मिटू शिंदे,सारिका ताई शिंदे, प्रभाताई शिंदे,अज्ञान बाई शिंदे, सखुबाई शिंदे, गौतम वाघमारे (सेवानिवृत्त – LIC), ग्रामस्थ दादा वाघमारे, भीम नगर कळंब येथील अध्यक्ष बापूराव जोगदंड,सचिव धीरज गायकवाड यांच्यासह महिला-पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
    शेवटी आभार प्रदर्शन संस्थेचे ज्येष्ठ सदस्य हनुमंत बापू ढगे यांनी केले.
error: Content is protected !!