March 26, 2026

महापुरुषांच्या आदर्शातून केलेले मोहेकर गुरुजींचे शैक्षणिक कार्य अतुलनीय – डॉ.प्रकाश पवार, कोल्हापूर

  • कळंब – महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,डॉ. पंजाबराव देशमुख,कर्मवीर,महर्षी वि.रा.शिंदे, महर्षी धों.के.कर्वे,डॉ. बापूजी साळुंखे,भाऊराव पाटील, कर्मवीर मामासाहेब जगदाळे आदी महापुरुषांचा आदर्श घेऊन शैक्षणिक आणि सामाजिक प्रचार प्रसाराचे कार्य केले.शिक्षण हेच परिवर्तनाचे माध्यम आहे, हे ओळखून त्यासाठी ज्ञान प्रसारक मंडळ संस्थेची आणि वसतिगृहाची १९५१ मध्ये मोहा येथे स्थापना केली.असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत तथा लेखक डॉ. प्रकाश पवार, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी केले.
    शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या ३४ व्या पुण्यस्मृतीदिन कार्यक्रमप्रसंगी व्यक्त केले.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळा अध्यक्ष अनिल मोहेकर,प्रमुख उपस्थितीमध्ये उच्च शिक्षण सहसंचालक, नांदेड विभाग, नांदेड प्रा.डॉ.किरणकुमार बोंदर,शि.म. ज्ञानदेव मोहेकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.अशोकराव मोहेकर, प्राचार्य डॉ. हेमंत भगवान,ज्ञान प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल,भागवत गव्हाणे (सहसचिव),प्रा.अंकुश पाटील (कोषाध्यक्ष),ज्येष्ठ संचालक तात्यासाहेब पाटील,रमेशभाऊ मोहेकर (प्रशासकीय अधिकारी), प्रा.डॉ. डी.एस. जाधव, प्रा.अंजली मोहेकर, बारीकराव शेळके, प्रा. गोकुळ घोलप, प्रा. वसंत मडके, संजय भोसले,विलास पवार, तात्यासाहेब पाटील, प्रकाश शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
    कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलन करून झाली. त्यानंतर साक्षी पावनज्योत विशेषांकाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अशोकराव मोहेकर यांनी केले.   यावेळी माजी विद्यार्थी सौ.डॉ.आश्विनी सचिन सूर्यवंशी आणि सौ.अस्मिता अतुल चाळक यांनी विद्याभवन हायस्कुलसाठी ५५ इंची सोनी कंपनीचा स्मार्ट टीव्ही भेट दिला.
    यावेळी गुणवंत विद्यार्थी,आदर्श शिक्षक व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह, शाल श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कमवा आणि शिका अंतर्गत कु. ज्ञानेश्वरी पांचाळ आणि कु.झिनत मुल्ला या विद्यार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात धनादेश वाटप केला.
    दरवर्षी देण्यात येणारा संस्थेच्या माजी विद्यार्थी (११वी ते बी.एस्सी.पदवी) ज्ञानरत्न पुरस्कार २०२५ – (स्मृतिचिन्ह, शाल श्रीफळ आणि रुपये पाच हजार राशी) यावर्षी प्रा.डॉ.किरणकुमार बोंदर यांना देण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना म्हणाले, आज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोबाईल सारख्या आधुनिक समाजमाध्यमाच्या अतिरेकी वापरापासून दूर करून शिक्षण, नियमित अभ्यास, संशोधन याकडे वळविण्याची गरज आहे. या महाविद्यालयाने आम्हांला शिक्षणा बरोबरच संस्कार आणि वेळोवेळी व्यासपीठ भरपूर दिले, आम्ही प्रतिकूल परिस्थितीमधून जिद्दीने अभ्यास केला, नियमित तासिका केल्या म्हणून आज या पदावर कार्यरत आहोत. यावेळी तत्कालीन आठवणी सांगत विद्यार्थ्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली. यावेळी मा.संजय जगताप,माजी प्राचार्य डॉ.एस.व्ही.पवार, प्रा.आबासाहेब बारकुल आदींनी मनोगत व्यक्त केले.  
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दादाराव गुंडरे व आभारप्रदर्शन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी मानले.कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
    या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ.के.डी. जाधव,प्रा.आप्पासाहेब मिटकरी,अधीक्षक हनुमंत जाधव, अरविंद शिंदे,अर्जुन वाघमारे, आदित्य मडके, संदीप सूर्यवंशी, कमलाकर बंडगर, उमेश साळुंखे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, शिक्षण प्रेमी नागरिक, माजी विद्यार्थी, स्थानिक मान्यवर व विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिक्षण महर्षीच्या कार्याला अभिवादन केले.
error: Content is protected !!