February 8, 2026

विद्याभवन हायस्कूलमध्ये शिक्षण महर्षी शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनानुसार कळंब शहरातील विद्याभवन हायस्कूल येथे दि.३० ऑगस्ट २०२५,वार शनिवार रोजी संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी शि.म. ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या ३४ व्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून गुरुजींच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
    या वेळी प्रशालेचे मुख्याध्यापक व्यंकट कुंभार,उपमुख्याध्यापक विक्रम मायाचारी,पर्यवेक्षक जे. एन.कोळी,ज्येष्ठ शिक्षक सुशील तीर्थकर,सुनील बारकुल,सोपान पवार,दत्तात्रय पवार,शहाजी माने, विनोद सागर,बंडू काळे,शरद टोम्पे,अकबर शेख,रवी कोल्हे, बंटी मडके,महेश माळवदकर, सुरेश चव्हाण,आप्पासाहेब वाघमोडे,सुरज मडके,संदीप पाटील,विशाल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
    तसेच ज्येष्ठ शिक्षिका आशा लोहार,मंगल माने,अलका टोणगे, रेखा बचाटे,उमा गाढवे,स्वाती घाडगे,आशा राऊत,रोहिणी मोहेकर,सुनीता येळे,सुचिता गुंजाळ,गायकवाड मॅडम,रेखा भोरे,भाग्यरेखा लोमटे,सुवर्णा गव्हाणे,बालिका गाडेकर या उपस्थित होत्या.
    शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये श्रीकांत पांचाळ,दत्तात्रय नलावडे,प्रशांत गुरव,अरुण काळे,संतोष नागटिळक,संजय सोनवणे,महेश कदम आदींनीही आपली उपस्थिती दर्शवून अभिवादन केले.
error: Content is protected !!