मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ३० ऑगस्ट २०२५ वार शनिवार रोजी ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे संस्थापक अध्यक्ष कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे यांच्या हस्ते मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी पर्यवेक्षक सतीश कानगुडे,सहशिक्षक डी.बी.मडके, सुर्यकांत गुंगे,प्रा.रोहित मोहेकर,उच्च माध्यमिक विभागाचे प्रा.सुनील साबळे यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
More Stories
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन