August 9, 2025

अनुकंपा भरती बाबत उमेदवारांना आवाहन

  • धाराशिव (जिमाका) – जिल्हा परिषदेत अनुकंपा धारक उमेदवारांना नियुक्ती देण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार अनुकंपा उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या www.zposmanabad.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. यामध्ये यादीतील अ.क्र.०१ ते १०० उमेदवारांची अनुकंपा भरती प्रक्रियेसाठी मुळ कागदपत्रांची पडताळणीसाठीचा कॅम्प दि. २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रत्येक दिवशी २५ उमेदवार याप्रमाणे सकाळी ११ वा. पासुन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सभागृह जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
    तेव्हा जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत अनुकंपा प्रतिक्षायादीवरील उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात येत की, त्यांनी कागदपत्र पडताळणीसाठी नमुद केल्याप्रमाणे त्यांचे शैक्षणिक व इतर मुळ कागदपत्रासह बेळेवर उपस्थित राहवे. त्याचप्रमाणे मुळ कागदपत्र सादर केली असल्यास सादर केलेली पोहोच व कागदपत्राची सत्यप्रतीसह उपस्थित राहावे.
    २९ नोव्हेंबर रोजी १ ते २५,३० नोव्हेंबर रोजी २६ ते ५०, १ डिसेंबर रोजी ५१ ते ७५, २ डिसेंबर रोजी ७६ ते १०० या क्रमांकाच्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. नेमुण दिलेल्या दिवशी अनुकंपाधारक उमेदवार उपस्थित न राहिल्यास अथवा उपस्थित राहून कागदपत्रांची पुर्तता न केल्यास प्रतिक्षायादी प्रमाणे उमेदवाराचा अनुकंपा नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. याअनुषंगाने उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी अर्ज केलेल्या पत्यावर कागदपत्राच्या पडताळणीसाठी पत्रव्यवहार रजिस्टर पोष्टाने केलेला आहे. तरी उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावरून पत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
error: Content is protected !!