August 9, 2025

हाजी नजमोद्दीन मुल्ला यांचे निधन

  • कळंब – हाजी नजमोद्दीन अजिजोद्दीन मुल्ला यांचे सोमवारी दि.२७ नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.ते नगरपालिका कळंब येथे स्वच्छता निरीक्षक या पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते.कळंब शहर व परिसरात त्यांचा चांगला जनसंपर्क होता.
    त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे,तीन भावंडे,पाच बहिणी असा परिवार आहे.ते डिकसळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच अमजद मुल्ला व डिकसळ ग्रामपंचायत सदस्य इम्रान मुल्ला यांचे वडील होते.तसेच पत्रकार परवेज मुल्ला,समीर मुल्ला व सलमान मुल्ला यांचे चुलते होते.
    त्यांच्या पार्थिवावर वर कळंब शहरातील हजरत तहसीलदार बाबा दरगाह येथे सोमवारी सकाळी ११.३० वाजता दफनविधी करण्यात आली यावेळी कळंब शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
    मुल्ला यांच्या निधनाने शहरात व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
error: Content is protected !!