धाराशिव (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा) – डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६७ वा वर्धापन दिन विद्यापीठ उपपरिसर धाराशिव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी उपपरिसराच्या प्र.संचालिका प्रा.डाॅ.मनिषा असोरे यांच्या शुभहस्ते विद्यापीठाचा ध्वजारोहण सोहळा पार पडला. त्यानंतर विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला कक्ष अधिकारी विद्याधर गुरव,इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डाॅ.रमेश चौगुले,सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डाॅ.राहुल खोब्रागडे,वसंतरावजी काळे स्वाभिमान शिक्षण योजनेचे समन्वयक प्रा.डाॅ.गोविंद कोकणे, जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख डाॅ. जितेंद्र कुलकर्णी,रसायनशास्त्र विभाग प्रमुख डाॅ.किशन हावळ, व्यवस्थापनशास्त्र विभाग प्रमुख डाॅ.सुयोग अमृतराव,तसेच प्रा. वरुण कळसे,प्रा.सचिन बसैय्ये, डाॅ.गणेश शिंदे,डाॅ.हर्षल ओमन, डाॅ.उषा कांबळे यांच्यासह अन्य प्राध्यापक,कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अभियंता प्रवीण आळंगे, वरिष्ठ सहाय्यक चंद्रकांत आनंदगावकर,श्रीकांत सोवितकर, संजय जाधव,प्रल्हाद इंगळे, धनराज सोमवंशी,सुधाकर राठोड, अशोक लोंढे,मल्लिनाथ लामजणे आदी मान्यवर,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. १९५८ साली स्थापन झालेले विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे आज मराठवाड्यातील उच्च शिक्षणाचा आधारस्तंभ ठरले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण,संशोधन, सामाजिक न्याय व समतेच्या मूल्यांचा प्रसार,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे ही या विद्यापीठाची वैशिष्ट्ये आहेत. ६७ वर्षांच्या या प्रवासात विद्यापीठाने हजारो विद्यार्थी घडवून समाजाच्या विविध क्षेत्रात त्यांना नेतृत्वाची संधी दिली आहे. विद्यापीठाच्या पुढील वाटचालीत संशोधनाला चालना देणे, तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाची अंमलबजावणी करणे,जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करणे, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम विकसित करणे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल व जागतिक पातळीवरील संधी उपलब्ध करून देणे हे महत्त्वाचे ध्येय ठेवण्यात आले आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान