भीमनगर – वर्षावासानिमित्त भीमनगर येथे दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी धम्मप्रवचनाचा कार्यक्रम पार पडला.या प्रसंगी भंते बुद्धघोष यांनी व्यसनमुक्ती, योग्य संस्कार आणि आहार-विहाराच्या शिस्तीचे महत्व पटवून दिले. ते म्हणाले की,“आजचा तरुण व्यसनात आकंठ बुडालेला आहे. मोबाईलच्या अतिरेकामुळे पालक मुलांच्या अभ्यासाकडे व संस्काराकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत.आजची महिला त्यागमूर्ती माता रमाईंच्या नावाने घरकुल घेते मात्र घरात कोट्यावधींची आई माता रमाईंचा फोटो लावायचा सोडून इतर देवदेवतांचे फोटो लावते.” स्वतःच्या मातोश्रींच्या निधनानंतर केवळ दोन दिवसांचे विधी पूर्ण करून अवघ्या १४ दिवसांत बारा गावांमध्ये धम्मप्रवचन केल्याचे सांगत त्यांनी धम्मकार्यास प्राधान्य दिल्याचे अधोरेखित केले. या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार सचिव लक्ष्मण धावारे यांनी तरुणांना धारेवर धरत “डी.जे.-डॉल्बीच्या नादात आजचा तरुण नाचणारा होणार की वाचणारा? जसा तू होशील तसा तुझा पोरगा होईल” असा सवाल उपस्थित केला. माजी नगरसेवक अमर गायकवाड यांचे चिरंजीव इंद्रसेन गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त धम्मदेशना देऊन त्यांना आदर्श नागरिक बनण्याची शुभेच्छा देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मारुती गायकवाड,माजी नगरसेवक सुनिल गायकवाड,निलेश गांजीकर,धीरज गायकवाड,मुकेश गायकवाड,नितीन गायकवाड, प्रेमकुमार गायकवाड,बापूराव जोगदंड,रुपेश गायकवाड, आयु.सुनंदा गायकवाड,आयु. शितल गायकवाड,बेबी गायकवाड, रमाबाई गायकवाड,प्रतिभा हौसलमल,पुनम गायकवाड, ठाणआंबिरेताई, करुणा गायकवाड यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन लक्ष्मण धावारे यांनी केले.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड