February 8, 2026

महाविद्यालयात संस्थापक सचिव कै.नरसिंग (आण्णा) जाधव यांना अभिवादन

  • कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,संभाजीनगर संलग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब व रासेयो/आयक्युएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेवा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे संस्थापक सचिव कै.नरसिंग (आण्णा) जाधव यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि.२४ ऑगस्ट २०२६, रविवार रोजी ‘अभिवादन कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला होता.
    कार्यक्रमात कै.नरसिंग (आण्णा) जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष शाम (नाना) खबाले,सचिव शिवाजी (आप्पा) कापसे,कोषाध्यक्ष बाळकृष्ण गुरसाळे,प्राचार्य डॉ.हनुमंत माने, उत्तरेश्वर (नाना) पाटील,रामदास चौधरी व लाटे दादा यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून करण्यात आले.
    तसेच रासेयो विभाग प्रमुख सौ. मनिषा कळसकर,आयक्युएसी विभाग प्रमुख प्रा.अनिल जगताप यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी कै.नरसिंग (आण्णा) जाधव यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
    या वेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!