कळंब ( माधवसिंग राजपूत ) – महाराष्ट्र राज्यात कृषी संस्कृतीत बैल पोळा या सणाला विशेष महत्त्व आहे,वर्षभर शेतकरी आपल्या भूमी मातेची सेवा करत आपल्या कष्टातून व श्रमातून धान्य पिकवतो यासाठी हजारो वर्षापासून गोवंश बैलाची मदत घेतो शेती शेतकरी व बैल असे समीकरण आहे आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या काळात शेती क्षेत्रातही बदल होताना दिसत असून आधुनिक उपकरणे,मशीन, याच्या माध्यमातून शेती केली जात आहे ,यामुळे मनुष्यबळ तसेच मदतीला असलेले पशुबळ कमी होत असून मोठ्या शेतकऱ्यांनी जनावरे संभाळणे कमी केले आहे यामुळे या पशुधनाकडे शेतकऱ्याचे अवलंबित्व कमी झाले आहे तरीपण आपल्या घरापुढे व शेतात गोठा असावा यामध्ये गाय वासरू व बैल बांधलेले असावेत या उद्देशाने अनेक शेतकरी गाय,बैल सांभाळतात,त्याचबरोबर शेतीला दूध हा पूरक व्यवसाय असल्याने आपणाला आज काही ठिकाणी जनावरे व गोठे दिसतात.या पशुधनाच्या मदतीने व त्यांच्या कडून शेती मशागतीची नांगरणी ,पेरणी,कोळपणी,तसेच वेळोवेळी शेतामध्ये साहित्य घेऊन जाणे,शेतीमाल,घरी वा बाजारात घेऊन जाण्यासाठी गाडी- बैलाचा उपयोग केला जातो,वर्षभर गुरांची देखभाल सुरू असते वेळेच्या वेळी चारा- पाणी करणे,गोठा स्वच्छ करणे ही कामे शेतकरी करतो मात्र विशेष उत्सवाचा दिवस असतो बैलपोळा हा सण श्रावण महिन्यात शेवटी अमावस्या दिवशी असतो पाऊस झालेला असतो शेतीतील पिके वाऱ्याच्या येणाऱ्या झुळकी बरोबर मान डवलीत उभी असतात केलेले परिश्रम व गाळलेला घाम यातून फळ व फुलांनी भरलेली शेती आनंद उत्साह वाढवत असते अशा या वातावरणात शेतकरी बैलपोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो यासाठी सणाची तयारी चालू असते सणाच्या आदल्या दिवशी बैल स्वच्छ धुतली जातात तसेच त्यांच्या शिंगाला रंग लावली जातात तर पोळ्या दिवसी सजवलेल्या बैलांची झूल टाकून ढोल ताशाच्या निनादात वाजत गाजत मिरवणूक काढली जाते, घरापुढे गाय ,वासरू, पूजा करू त्यांना गोड पुरणपोळी भरवली जाते , व चौं-चौ चांगभले पाऊस आला चला घराला म्हणत बैलांची मंगलाष्टके गात लग्न लावण्याची प्रथाही आहे, गाय बैल नसलेले विशेषतः शहरातील लोक मातीची बनवलेली बैल जोडी व गाय वासरू याची पूजा करतात पूर्वीपरंपरेने शेतकरी स्वतः दोरखंड वळणे ,कासरा तयार करणे, व मोरखी, बाशिंग तयार करीत आसतं परंतु आज बाजारात तयार असे साहित्य मिळत आहे, गेल्या दोन दिवसापासून कळंब बाजार पेठेत पोळ्याचे साहित्य, तसेच बैल सजावट करण्यासाठीचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहे कळंब तालुक्यात व शेजारी वाशी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे यामुळे नदीकाठीच्या शिवारात पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची मोठी नुकसान झाले आहे तरीपण आपल्या शेतीकामात मदत करणारा सर्जा,राजाला सजवण्यासाठी बाजार पेठेतून शेंब्या,घुंगरमाळा,बाशिंग,आरसे लावलेल्या झुली,शिंगाना लावण्यासाठी वारणीस, पळसमोळ, रंगीबेरंगी फुगे, बेगड, कवड्याच्या माळ,घुंगरू माळा खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.मे महिन्यात अवकाळी पाऊस पडला पुढे पावसाची ओढ झाली परंतु गेल्या आठवड्यात पाऊस पडला आहे नदीकाठी जमिनीचे व पिकाचे नुकसान झाले आहे.पाऊस पडतो की नाही ही चिंता दूर झाली आहे.
बैल सजावटीचे साहित्याचे भाव स्थिर आहेत अशी माहिती गेली वर्षापासून बैलपोळा साहित्य विक्री करणारे व्यापारी तथा सा.साक्षी पावनज्योत प्रतिनिधी शिवराज पौळ,आसेफ तांबोळी,व लहूराज अष्टेकर यांनी सांगितले. बैल पोळा या सणाला शेतकऱ्यात महत्त्व आमच्याकडे बावीस एकर जमीन आहे,शेती आधुनिक यांत्रिक साधना द्वारे करून घेतली जाते परंतु शेतामध्ये बैल नाहीत याची मनात खंत आहे. — जयंत लांडगे, शेतकरी खोंदला.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन