February 9, 2026

मोहेकर महाविद्यालयामध्ये विवेकवहिणीची स्थापना

  • कळंब – शहीद डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्य बलिदान दिनाचे औचित्य साधून शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे अंधश्रधा निर्मूलन समिती कळंब अंतर्गत विवेकवहिणीची स्थापना करण्यात आली.महाराष्ट्र विवेकवाहिनी हे विवेकी विचारांच्या आधारे स्वतःचा आणि समाजाचा विकास कृतीशील, विधायक मार्गाने करू इच्छिणाऱ्या महावि‌द्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांचे संघटन आहे.शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला हा उपक्रम महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांत आजही जोमाने सुरु आहे. उच्च शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य यांची हा उपक्रम महाविद्यालयांमध्ये राबविण्यास मान्यता आहे. महाविद्यालयाचे व्यवस्थापन आणि प्राचार्य यांच्या पुढाकाराने विवेकवाहिनी महाविद्यालयात चालवली जाते.
    या विवेकवहिणीच्या स्थापनेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र अंधश्रधा निर्मूलन समिती प्रधान सचिव रुक्साना मुल्ला ह्या उपस्थित होत्या तसेच व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हेमंत भगवान,अनिस धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद शिंदे,प्रधान सचिव प्रा. बालाजी राऊत,प्रशिक्षण विभाग कार्यवाह तुकाराम शिंदे, विवेकवाहिनी कार्याध्यक्ष प्रा. संजय सावंत.डॉ.अर्चना मुखेडकर.उपस्थित होते.
    विवेकवाहिनी कार्यकारणी खालील प्रमाणे स्थापन करण्यात आली यामध्ये अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हेमंत भगवान,कार्याध्यक्ष प्रा.संजय सावंत,सचिव प्रा.बालाजी राऊत, डॉ.दत्ता साकोळे,प्रा.वर्षा सरवदे, विद्यार्थी संघटक पृथ्वीराज झाडके विद्यार्थिनी संघटक ज्ञानेश्वरी पांचाळ म्हणून यांची निवड करण्यात आली व सदस्य म्हणून
    आरती पाटील,मयुरी हालगुडे,मुस्कान शेख,ऋतुजा कुंभार,ऐश्वर्या सातपुते,कशिश मुंडे,सानिया शेख,अंजींक्य बड़े,अभिजित मोरे.प्रियांका खरटमोल,कल्याणी कवडे,वेदिका कुलकर्णी,प्रिया सिरसट,तेजस्विनी गुजर ,झीनत मुल्ला,शितल वाघमारे,नंदिनी कदम व गौरी तांबारे यांची निवड झाली.
    या कार्यक्रमचे सूत्रसंचालन डॉ. दत्ता साकोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.विश्वजीत मस्के यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.सुरेश धावारे, अनिता खंडागळे,संदीप सूर्यवंशी यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!