धाराशिव (जिमाका) – इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळा अंतर्गत कार्यरत असलेल्या १३ उपकंपन्यांचे कामकाज आता धाराशिव जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे. या उपकंपन्यांत जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ (लिंगायत वाणी),संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ (गुरव समाज),संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ (न्हावी समाज),लेवा पाटीदार समाज आर्थिक विकास महामंडळ (लेवा समाज),सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ (वाणी समाज), स्व.विष्णुपंत रामचंद्र दादरे आर्थिक विकास महामंडळ (लोणारी समाज),संत नामदेव महाराज शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ (शिंपी समाज),संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ (सुतार समाज),सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळ (गुजर समाज),संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ (सोनार समाज),संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ (तेली समाज),संत रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ (बारी समाज) आणि आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ (आगरी समाज) यांचा समावेश आहे. महामंडळामार्फत सध्या सहा योजना राबवल्या जात आहेत.त्यापैकी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना,गट कर्ज व्याज परतावा योजना,शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना आणि महिला स्वयं सिद्धी व्याज परतावा योजना या पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात आहेत.पात्र अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह www.msobcfdc.org या पोर्टलवर अर्ज करणे अनिवार्य आहे. तर २० टक्के बीजभांडवल योजना व थेट कर्ज योजना या ऑफलाईन स्वरूपाच्या असून त्यांचे अर्ज जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत. या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी जिल्हा व्यवस्थापक वृषाली लहारे यांनी आवाहन केले आहे.अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीजवळ,औरंगाबाद रोड,धाराशिव येथे अथवा दूरध्वनी क्रमांक ०२४७२-२२३८६३ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान