मोहा (प्रविण कसबे) – कळंब तालुक्यातील मोहा ग्रामपंचायत कार्यालयात ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर ग्रामपंचायत सरपंच सिमा संदीप मडके यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. तसेच मोहा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी येथे चेअरमन गौतमराव मडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य तथा कळंब कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संदीप मडके, उपसरपंच बशारत मोमिन, संजय मडके, सोमनाथ मडके, ग्रामपंचायत सदस्य रूपाली कसबे, बाबा कसबे, राहुल कसबे, बालाजी मडके, सोसायटीचे संचालक हनुमंत मडके, अमर मडके, पोलिस पाटील पांडुरंग मडके आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेचे विद्यार्थी, शिक्षकवृंद व गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होऊन “भारत माता की जय” व “वंदे मातरम” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
More Stories
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन