शिराढोण (परमेश्वर खडबडे) – कळंब तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व चाळीस गावांची प्रमुख बाजारपेठ असलेल्या शिरढोण येथे अपर तहसील कार्यालय व पद मंजुरीसाठी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे कळंब तालुका अध्यक्ष नितीन पाटील यांनी दि.१५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांना दिले. शिराढोण गावाचे विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र,वाढती लोकसंख्या आणि महसुली कामांसाठी शिरढोण ते कळंब इतका लांब प्रवास नागरिकांना करावा लागतो. उत्पन्न प्रमाणपत्र,रहिवासी दाखला,विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, शेतकऱ्यांची पीक नोंदणी,वृद्धांना पेन्शन योजना अशा अनेक दैनंदिन महसुली कामांसाठी गावकऱ्यांना वेळ,पैसा आणि श्रम खर्च करावे लागतात. या पार्श्वभूमीवर शिरढोण येथे अपर तहसील कार्यालय स्थापन झाल्यास चाळीस गावातील नागरिकांना महसुली सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होतील.प्रशासन अधिक जलद, पारदर्शक व परिणामकारक पद्धतीने कार्य करेल तसेच प्रवासाचा वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचेल.शासकीय योजनांचा लाभ सुलभ व प्रभावीपणे मिळेल,असा विश्वास निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.
More Stories
🕌 सातव्या वर्षी पहिला रोजा;आदम पटेलच्या श्रद्धेचे सर्वत्र कौतुक 🌙
शिराढोण व कळंब तालुक्यातील नागरिकांच्या मागणीला पाठबळ
ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासाठी पदनिर्मिती प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची मागणी