कळंब – तांदुळवाडी येथील कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल मध्ये दि.१५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम मुसळधार पावसातही मोठ्या उत्साहात व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. या कार्यक्रमास शाळेचे अध्यक्ष रवि नरहिरे,उपाध्यक्षा सौ.आशा नरहिरे,सचिव प्रणव नरहिरे तसेच उपप्राचार्य पवन कुमार कुलकर्णी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून बंडू खिंवसरा व डॉ.सचिन पवार यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. सुरुवातीस राष्ट्रपिता महात्मा गांधी व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रशांत धावारे व विशाल धावारे बंधू यांनी स्वागतगीत सादर करून कार्यक्रमाला सुरेख प्रारंभ दिला. त्यानंतर इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांनी मराठी,हिंदी व इंग्रजी भाषण सादर केले. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी सुशील फुलारी व व्याख्याते महादेव खराटे उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना देशभक्ती व सामाजिक बांधिलकीची जाणीव जोपासण्याचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नाटिका, एकतेचा संदेश देणारे नृत्य तसेच इयत्ता ४ थी व ५ वी च्या विद्यार्थ्यांनी प्रभावी कवायती सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी प्रांजल देशमुख,समृद्धी सलगर व युगंधरा देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन सौ.माधुरी जंगम यांनी केले.उपप्राचार्य पवन कुमार कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाचे महत्व पटवून दिले. सांस्कृतिक व क्रीडा विभागासह सर्व शिक्षक व पदाधिकारी यांच्या प्रयत्नामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.विशेष म्हणजे, मुसळधार पावसातही अपेक्षेपेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित राहून आपल्या देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहत होते.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड