February 8, 2026

ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा.भास्कर चंदनशिव यांचा गौरव

  • कळंब – ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा.भास्कर चंदनशिव यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर उपपरिसर धाराशिव तर्फे विद्यापीठाच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त “जीवन साधना पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
    दि.१६ ऑगस्ट २०२५ रोजी धाराशिव येथे झालेल्या या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ रजनीश कामत, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विजय फुलारी,प्रभारी कुलगुरू वाल्मिकी सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर,विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अंकुश कदम, सिनेट सदस्य डॉ.नरेंद्र काळे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रा.चंदनशिव यांना सन्मानपत्र,शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
    या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख,प्राचार्य डॉ. रमेश दापके,माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील,ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ एम.डी.देशमुख, माजी बोर्ड मेंबर भा.न.शेळके, अरुण बोबडे आदी मान्यवर उपस्थित होते.
    प्रा.चंदनशिव यांचा सन्मान झाल्यानंतर कळंब येथे त्यांच्या निवासस्थानी विशेष सत्कार आयोजित करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व सेवानिवृत्त नायब तहसीलदार प्रकाश गव्हाणे (बार्शी),धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे,जि.प. माध्यमिक शिक्षक डॉ.अशोक शिंपले,पत्रकार माधवसिंग राजपूत व प्रदीप यादव यांनी त्यांचा शाल, हार घालून सन्मान केला.
    सत्कार प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश गव्हाणे यांनी ‘प्रकाशपर्व’ (गौरव ग्रंथ), ही जात माणसाची (चारोळी संग्रह), होरपळलेले पाय (कथासंग्रह),मागे वळून बघताना (काव्यसंग्रह) ही चार पुस्तके प्रा. भास्कर चंदनशिव यांना भेट दिली.
    या वेळी प्रा.चंदनशिव सरांचे सुपुत्र प्रा.कपिल चंदनशिव यांची विशेष उपस्थिती होती.
error: Content is protected !!