कळंब – प्रत्येक वर्षी प्रमाणे याही वर्षी रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीच्या वतीने १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तुळजाई प्रतिष्ठान संचालित संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मुकबधिर विद्यालय कळंब जि. धाराशिव येथे ज्या मुलांना बोलता येत नाही व ऐकता येत नाही अशा मूकबधिर मुलांचा सामूहिक वाढदिवस सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी चे सचिव रो.श्याम जाधवर व निखिल भडंगे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मुकबधिर मुलांनी केक कापून वाढदिवस साजरा केला.सर्व मुलांना खेळाचे साहित्य बॅट,बॉल,फुटबॉल,मच्छरची बॅट, फर्स्ट कार्ड तसेच किटमध्ये पाणी बॉटल,कोलगेट ब्रश,सिस पेन्सिल, बिस्किट,कुरकुरे,चिप्स,रंगपेटी, खोडरबर,शॉपनर,चित्रकला वही, वही,इत्यादी साहित्य सर्व रोटरीयन यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. प्रत्येक वर्षी प्रमाणे याही वर्षी बालाजी माहिती यांनी सहकुटुंब येऊन शाळेतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी शाम जाधवर बोलताना म्हणाले की,स्वातंत्र्य दिनानिमित्त मुकबधिर मुलांचा सामूहिक वाढदिवस असाच कायम चालू राहील.व सर्व मुलांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी किरण चव्हाण व निखिल भडंगे (प्रोजेक्ट चेअरमन) संजय देवडा,सतीश मांडवकर,डॉ.रुपेश कवडे,डॉ.नीलकंठ चोपणे,धर्मेंद्र शहा,बालाजी बाहेती,बाबर साहेब,अरविंद शिंदे,श्रीकांत कळंबकर,अशोक काटे,डॉ.सचिन पवार,सौ.धनश्री कवडे (महिला शिवसेना शहरअध्यक्ष,शाळेचे मुख्याध्यापक बालाजी जाधवर, शाळेतील सर्व विद्यार्थी व कर्मचारी उपस्थिती होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक निखिल भडंगे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्रुबा कोठावळे यांनी केले. शेवटी सर्व मुलांना दाबेलीचे खाऊ वाटप करून कार्यक्रम संपन्न झाला.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड