सन्माननीय वाचक / वर्गणीदार / जाहिरातदार बंधूंनो, सविनय व सप्रेम जय महाराष्ट्र!
सा. साक्षी पावनज्योत या साप्ताहिक वर्तमानपत्राचा ९ वा वर्धापन दिन दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते विशेषांकाचे प्रकाशन करून साजरा करण्यात येणार आहे.
समाजातील दबलेले,कुचलेले प्रश्न वेशीवर टांगून शासन-प्रशासनाच्या निदर्शनास आणत,बहुजनांच्या न्यायहक्कांसाठी आम्ही अहोरात्र व अखंडपणे परिवर्तनाची पावनज्योत आपल्या साक्षीने तेवत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील काळातही हा प्रयत्न सातत्याने राहील, याची हमी देत आहोत.
सा. साक्षी पावनज्योत हे साप्ताहिक वर्तमानपत्र असले तरी, न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कोणत्याही स्वरूपातील बातम्या तात्काळ संबंधितांपर्यंत पोहोचवून, दलित-बहुजनांना न्याय मिळवून देण्याचे कार्य आम्ही करत आहोत.
नवोदित साहित्यिकांना हक्काचे विचारपीठ उपलब्ध करून देत, त्यांना लिहिते घडविण्याचे काम आम्ही सातत्याने करीत आहोत.आमच्या जिद्द,चिकाटी आणि कठोर परिश्रमांना आपल्या जाहिराती व वर्गणीच्या रूपाने मिळालेल्या आर्थिक पाठबळामुळे आम्हाला गरुडझेप घेता आली आहे.पुढेही हे पाठबळ मिळेल, अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो.
सा. साक्षी पावनज्योत चा ९ वा वर्धापन दिन आणि भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७९ वा वर्धापन दिन (७८ वर्षे पूर्ण) या निमित्ताने आपणांस साक्षी पावनज्योत परिवाराकडून हार्दिक मंगलमय शुभेच्छा!
आपला कृपाभिलाषी, सुभाष द.घोडके संपादक सा.साक्षी पावनज्योत
धाराशिव जिल्हा प्रतिनिधी – सतीश घोडेराव विशेष प्रतिनिधी – राजेंद्र बारगुले विद्यापीठ प्रतिनिधी – प्रा.डॉ. गोविंद कोकणे नागपूर प्रतिनिधी – प्रविण बगाडे विशेष प्रतिनिधी – प्रत्यूष बाबा
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी