कळंब – एकेकाळी मराठवाड्यातील सर्वात मोठ्या कृषी बाजारपेठांपैकी एक असलेल्या कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीने,गेल्या काही वर्षांतील अडचणी व अव्यवस्थेवर मात करत,विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. सभापती शिवाजी कापसे आणि उपसभापती प्रा.श्रीधर भवर यांच्या नेतृत्वाखाली,बाजार समिती आज पुन्हा उभारी घेत आहे. भूतकाळातील अडचणीमध्ये बाजार समितीत गैरव्यवस्था, बेकायदेशीर जागा विक्री आणि दलालांचे प्रस्थ,पक्के रस्ते,स्वच्छ परिसर,मूलभूत सुविधांचा अभाव,शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्यांना जागेअभावी त्रास,अतिक्रमण व बेकायदेशीर शेड बांधकामाचे साम्राज्य आधी समस्यावरील सुधारणा आणि पारदर्शकता तसेच नवे नेतृत्वाची ओळख दाखविण्यासाठी अतिक्रमण हटवणे व नवे रस्ते बांधकाम,प्लॉट धारकांशी संवाद साधून मुदतवाढ व मूल्यवृद्धी,समितीच्या उत्पन्नात वाढ,सर्व निर्णय संचालक मंडळाच्या एकमताने व विकासाचे प्रतीक – भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स योजना करण्यासाठी बाजार समितीच्या रिकाम्या दोन एकर जागेवर चार मजली शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे, ज्यामध्ये २०० ते २३० दुकाने,शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वसतिगृह,शेतकरी भवन,हमाल भवन,व्यापारी भवन,बँका, आधुनिक कार्यालये व अत्याधुनिक सभागृह,आराखडे व मंजुरी प्रक्रिया पूर्ण,वैकल्पिक जागा देण्याचा निर्णयही निश्चित करण्यात येणार आहे. भविष्यातील संकल्प म्हणून सभापती शिवाजी कापसे, उपसभापती श्रीधर भवर आणि संचालक मंडळाचा ठाम संकल्प असा दिसून येतो. > गेल्या ७० वर्षांत जे शक्य झाले नाही, ते पुढील ५ वर्षांत पूर्ण करायचे..! यासाठी तरुण अधिकारी-कर्मचारी आणि संचालक मंडळ मंजुरीसाठी पुणे-मुंबईत प्रत्यक्ष भेटी देत आहेत.व्यापारी,शेतकरी,स्थानिक संस्था आणि प्रशासन यांनी या विकासयात्रेत हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीपुन्हा एकदा शेतकरीहित, पारदर्शकता आणि विकास यांचे प्रतीक होण्यासाठी सज्ज झाली आहे.नव्या नेतृत्वाचा हा प्रयत्न यशस्वी झाला,तर कळंबची बाजारपेठ महाराष्ट्रातील आदर्श बाजार समिती ठरेल,यात शंका नाही.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन