मोहा – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार विद्यालय,मोहा येथे दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी इयत्ता ६ वीतील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून कार्यनुभव तासिकेमध्ये रंगीबेरंगी,वेगवेगळ्या आकाराच्या व विविध रंगसंगतीच्या आकर्षक राख्या तयार केल्या. या स्पर्धेत प्रथम क्रमांक – कु. अमृता कांबळे, द्वितीय क्रमांक – कु. अंकिता मते, तृतीय क्रमांक – कु. साक्षी कोकाटे यांनी मिळविला, तर उत्तेजनार्थ पारितोषिक – ओमसिंह गरुड यांना प्रदान करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक कमलाकर शेवाळे, चिलवंत श्रीमती उषा पांचाळ, धनंजय परजणे,जाधव विष्णूदास यांचे विशेष सहकार्य लाभले.या प्रसंगी प्रशालेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन