August 9, 2025

कै.जगन्नाथ (बापू) मिटकरी यांना मरणोत्तर पुरस्कार

  • संत शिरोमणी मन्मथ स्वामी सेवाभावी संस्थेचा भावपूर्ण गौरव
  • कळंब – कळंब येथील संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा दिनांक १८ ते २१ जुलै २०२५ या कालावधीत मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याच्या सांगता कार्यक्रमात, दिनांक २१ जुलै रोजी संत शिरोमणी मन्मथ स्वामी सेवाभावी संस्था, कळंब यांच्यातर्फे संस्थेचे माजी ट्रस्टी कै.जगन्नाथ (बापू) बाबुराव मिटकरी यांना त्यांच्या सेवाभावी योगदानाबद्दल मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
    हा पुरस्कार श्री ष. ब्र. १०८ विरूपाक्ष शिवाचार्य महाराज (मानूरकर),श्री ष. ब्र.१०८ महादेव महाराज शिवाचार्य (वाईकर),श्री ष. ब्र. १०८ शांतलिंग शिवाचार्य महाराज (कोकटनूरकर) आदींच्या पावन हस्ते प्रदान करण्यात आला.
    कै.मिटकरी यांचे सुपुत्र कीर्तनकार उमाशंकर मिटकरी आणि नात कु. भक्ती मिटकरी यांनी हा सन्मान स्वीकारला.
    या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र दगडूअप्पा मुंडे,पंच कमिटी अध्यक्ष सागर मुंडे,सर्व माहेश्वर मूर्ती,कीर्तनकार,गायक,भजनी मंडळाचे सदस्य,सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर तसेच हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन भक्तिभाव,सेवा आणि परंपरेचे उत्तम प्रतीक ठरले.कै.मिटकरी यांचे समाजासाठीचे योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल,अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
error: Content is protected !!