August 9, 2025

शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना महाविद्यालयात अभिवादन

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली,कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात दिनांक १७ जुलै २०२५ रोजी (गुरुवार) संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या पुतळ्यास प्रा.डॉ.सुशील शेळके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
    या प्रसंगी सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,संचालक प्रा.वसंत मडके, संचालक डॉ.संजय कांबळे,प्राचार्य डॉ.हेमंत भगवान,उपप्राचार्य अप्पासाहेब मिटकरी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत सुसूत्रपणे पार पाडण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्षांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाची आठवण करून देत उपस्थितांनी त्यांच्या कार्याची गौरवमयी आठवण जपण्याचा निर्धार व्यक्त केला.
error: Content is protected !!