August 9, 2025

आत्महत्येचे स्टेटस ठेवून ग्रामसेवक केशव गव्हाणे ५ दिवसांपासून बेपत्ता

  • कळंब तालुक्यात खळबळ
  • कळंब – आथर्डी ता.कळंब येथील ग्रामसेवक केशव गव्हाणे हे आत्महत्येचा इशारा देणारे स्टेटस ठेवून गेले ५ दिवसांपासून बेपत्ता आहेत.या प्रकारामुळे संपूर्ण कळंब तालुक्यात खळबळ उडाली असून,ग्रामसेवक संघटनेसह त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिस प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार, गावातील चौधरी नावाच्या व्यक्तीने काही समर्थकांसह ग्रामसेवक गव्हाणे यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. “गावात आलास तर हातपाय तोडतो”, अशा प्रकारच्या धमक्या सायंकाळी ६.३० वाजता दिल्या गेल्या,आणि याच धमकीनंतर गव्हाणे यांनी “मी आत्महत्या करतो” असा मजकूर लिहून मोबाईल स्टेटसवर पोस्ट केला.
    त्यानंतरपासून त्यांचा कोणताही संपर्क होत नसल्याने कुटुंबीय व ग्रामस्थ चिंतेत आहेत.गव्हाणे यांची पत्नी देखील मानसिक तणावाखाली असून,त्यांची प्रकृती बिघडत चालली आहे.

  • याप्रकरणी कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असली तरी पोलीस तपास संथगतीने सुरू आहे.धमकी देणाऱ्या व्यक्तींची अद्याप चौकशी न झाल्याने ग्रामसेवक संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
    ग्रामसेवक केशव गव्हाणे यांचा तात्काळ शोध घ्यावा,दोषींवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी जोर धरत आहे.
error: Content is protected !!