September 24, 2026

ज्ञान प्रसार विद्यालय मोहा येथे इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप

  • मोहा– ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार
    विद्यालय,मोहा येथे दि.१५ जुलै २०२५ रोजी इयत्ता ५ वी मधील सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेच्या वतीने मोफत शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.या उपक्रमात विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक व प्राचार्य अविनाश मोरे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे ज्येष्ठ संचालक तात्यासाहेब पाटील (आबा) यांनी उपस्थिती लावली.कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर (आण्णा) गुरुजींच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.
    यावेळी प्रशालेतील सहशिक्षक कमलाकर शेवाळे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर श्रीमती पांचाळ उषा यांनी उपस्थितांचे आभार मानले.या प्रसंगी सहशिक्षक चिलवंत राजाभाऊ,धनंजय परजणे,जाधव पांडुरंग यांच्यासह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!