समाजवादी विचारातून छात्रभारती राष्ट्रवादीच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नावर पथनाट्यातून जागृती करण्यासाठी पुण्यामध्ये एक कॉलेज तरुण तरुणींचा गट एकत्र आला समाजाच्या विविध प्रश्नांवर पथनाट्यातून जागृती करण्यासाठी मोहीम हाती घेतली. या गटाने किमान तीन ते चार हजार पथनाट्य सादर केली. केवळ पथनाट्य करून समाजाचे प्रश्न सोडवून होणार नाहीत. याची जाणीव सर्वांना झाली आणि जाणीव संघटना अस्तिवतात आली. गोरगरीब, वंचित, उपेक्षित, दलित, शहरी झोपडपट्टीमध्ये राहणारे कामगार यांच्यासाठी आपल्याला काही तरी करायला पाहिजे हे ठरवून पुण्यातील झोपडपट्ट्यांमध्ये मुलांसाठी शिक्षण मोहीम सुरू केली. झोपडपट्टी मधील मुलांना शिकवत असताना लक्षात आले की बहुसंख्य समाज हा मराठवाड्यातून आलेला आहे. आणि मग मराठवाड्यामध्ये जावूनच आपण त्याठिकाणी लोकांचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, विकासाच काम केलं पाहिजे. ही भूमिका पुढे आली. धाराशिव जिल्ह्यामध्ये पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून नूतन शिरसाठ ही एकटी वीस वर्षाची तरुणी थेट कळंब मध्ये पोहोचली. भोगजी या गावात राहिली एक वर्ष गावात राहून लोकांमध्ये जाणीव जागृतीचे काम केले.एक वर्षाच्या कामानंतर नूतन शिरसाठ पुण्यामध्ये परत आल्या मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात सुरू केलेलं सामाजिक प्रबोधनाचं काम पुढे घेऊन जाण्यासाठी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून विश्वनाथ अण्णा तोडकर हे तरुण कार्यकर्ता पुढे आले. दुष्काळात धाराशिव तालुक्यातून गोजवाडा गावातून पोटासाठी स्थलांतरित झालेले कुटुंब त्यातील हे तरुण आपल्या गावाकडे जाऊन गावांसाठी, लोकांच्या हक्कासाठी, विकासासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना घेऊन 1986 साली विश्वनाथ अण्णा तोडकर हे पुण्याहून थेट कळंब पोहोचले. मग भोगजी मध्ये व आसपासच्या गावामध्ये रोजगार हमीच्या अंतर्गत लोकांना काम मिळवून देण्यासाठी मोठी मोहीम सुरू झाली. हे काम करता करता तालुक्यातील अनेक कॉलेज तरुणांना सोबत घेऊन शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित,भूमीहीनांच्या रोजगाराच्या हक्कासाठी मोठे अभियान उभे केले. धाराशिव ,लातूर, बीड या तीन जिल्ह्यांमध्ये कार्याचा विस्तार केला. कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार झाली. पुढे भूकंपग्रस्तांच्या किल्लारी, सास्तुर येथे शंभर दीडशे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन हि टीम ज्या दिवशी भूकंप झाला त्याच दिवशी दुपारी एक वाजता किल्लारीत पोहोचली. किल्लारीचा भूकंप मनाचा थरकाप पुरवणार भयान दृश्य दगड मातेच्या ढिगार्याखाली प्रेतांचा खच, अनेक जण धाय मोकलून रडू लागले. मातीच्या ढिगार्यातून माणसांची प्रेत बाहेर काढण्याचं काम सुरु झाल. त्या कामापासून सुरू झाला भूकंपग्रस्तांच्या सर्वांगीण विकासाचे काम त्यातील हजारो अनुभव. संघटनेच्या माध्यमातून झालेल्या कामाला संस्थात्मक कामाची जोड देण्याची गरज आहे. काहीतरी नवीन पर्याय शोधण्याची गरज आहे याची जाणीव झाली आणि पर्यायची निर्मिती झाली. दुष्काळात गरीब शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी मोफत चाऱ्याची सोय पर्यायाने केली. 1000 कुटुंबांना मदत झाली. मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी तुळजापूर तालुक्यातील 50 गावात बालपंचायत चे काम सुरु केले. आजची बालपंचायत उद्याची ग्रामपंचायत अशी त्यातली भूमिका होती. तसेच छत्रपती संभाजीनगरच्या 10 झोपडपट्टीमध्ये बाल कामगार मुलांसाठी शिक्षण, शाळा, हजारो विधवा, परीतक्ता, एकल महिलांचे संघटन केले. दुष्काळी गावांमध्ये पाण्याची अडचण संपवण्यासाठी गावांमध्ये नदी, नाले, ओढे यांचे खोलीकरण केले. यामुळे किमान आठ हजार एकर जमिनीला या नदी खोलीकरणाचा उपयोग होतोय. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या 53 कुटुंबाला घर बांधून दिली. धाराशिव जिल्ह्यामधील कळंब ,वाशी, भूम तालुक्यातील 3000 कुटुंबांना शौचालय बांधून दिली. तसेच मागील सहा वर्षापासून कळंब ,वाशी, भूम, परंडा, या चार तालुक्यातील 450 विधवा, परीतक्ता शेतकरी महिलांना तूर, उडीद, सोयाबीन, बी-बियांचे वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये 12 हजार कुटुंबांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य, पर्याय संस्थेच्या पुढाकारातून महाराष्ट्र लोकविकास मंच ने 400 स्वयंसेवी संस्था चे व्यासपीठ महाराष्ट्रामध्ये उभा केलेले आहे. या सर्व संस्थांची मार्गदर्शक संस्था म्हणून पर्याय संस्था आज कार्य करत आहे. संपूर्ण मराठवाड्यातील 50 हजार दलित, भूमिहीन, कुटुंबाच्या उपजीविकेसाठी गायरान जमिनीचा हक्क मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत जमीन अधिकार आंदोलनाच्या माध्यमातून काम चालू आहे. गरीब, भूमिहीन, कष्टकरी, आदिवासी ,वंचित भारतीय राज्यघटनेने दिलेले सर्व अधिकार सामाजिक सन्मान, अन्न, वस्त्र ,निवारा ,आरोग्य, शिक्षण ,रोजगार आणि सक्षम उपजीविकेचे साधन मिळालं पाहिजे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सावित्रीबाई फुले महिला बचत गटाचे फेडरेशनच्या अंतर्गत अनिक फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही एक NBFC-MFI मायक्रो फायनान्स कंपनी काम करत आहे. पर्याय संस्थेचे काम अखंडित चालू आहे. आणि चालू राहील. असा विश्वास पर्याय संस्थेचे कार्यवाह विश्वनाथ अण्णा तोडकर यांनी व्यक्त केला. शब्दांकन – विकास कुदळे हावरगाव.ता.कळंब.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले