कळंब – “संकल्प से सिद्धी” अंतर्गत आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ४ जुलै रोजी कळंब शहर अंतर्गत इंदिरा नगर भागात भाजपा शहराध्यक्ष मकरंद पाटील यांच्या नेतृत्वात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी नागरिकांनी प्राथमिक सुविधाच्या बाबतीत कळंब नगर परिषद दुर्लक्ष करत असल्याची तक्रार केली,याबाबत नागरिकांच्या मनात प्रचंड रोष व नाराजी दिसून आली,नाली साफ होत नाही व कचराही उचलला जात नाही याबाबतीत प्रशासन हतबल आहे. लोकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याची व्यथा यानिमित्ताने जनता दरबारात ऐकायला मिळाल्याने . भारतीय जनता पार्टी हा विषय गांभीर्याने घेऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्या विषयी कळंब नगर परिषद प्रशासनाला जाब विचारेल आणि शहर स्वच्छता करण्यासाठी भाग पडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. जनता दरबार यशस्वी करण्यासाठी किशोरभाऊ वाघमारे,शिवाजी शेंडगे,सचिन तिरकर,धनंजय आडसुळ,अशोक क्षीरसागर,रुपेश कांबळे यांनी पुढाकार घेतला.या दरबार प्रसंगी सतपाल बनसोडे,प्रकाश काका भडंगे,परशुराम देशमाने,भूषण करंजकर,सुदर्शन देशमुख,गोविंद आडसुळ,इलियास कुरेशी,छाया बोंदर,संगीता कोकीळ यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले