कळंब – तालुक्यातील बोर्डा ग्रामपंचायतने पंचायत विकास निर्देशांक (PAI) सन 2022- 23 या वर्षाचा प्रथम क्रमांक मिळवला आहे.पंचायत विकास निर्देशांक ही संकल्पना शासन स्तरावरून राबविण्यात आले होती.त्यानुसार बोर्डा ग्रामपंचायतने सदर प्रक्रियेत सहभाग घेऊन 70.34% गुण प्राप्त करून तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल पंचायत समिती कार्यालय कळंबच्या वतीने विनोद जाधव गटविकास अधिकारी वर्ग 1, झांबरे एच.ए विस्तार अधिकारी,साळुंखे डी.टी विस्ताराधिकारी,यावेळी DNA 136 संघटनेचे अध्यक्ष भारत सोनवणे व संघटनेचे पदाधिकारी , ग्रामपंचायत अधिकारी,संगणक परिचालक उपस्थित होते.बोर्ड ग्रामपंचायतचे सरपंच सौ.आशा शेळके,उपसरपंच प्रणव चव्हाण, ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग तोडकर,तंटामुक्ती अध्यक्ष व्यंकट शेळके,संगणक परिचालक भागवत शेळके यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामुळे ग्रामपंचायत बोर्डाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले