August 9, 2025

सम्यक समाज संघाचे राष्ट्रीय संविधान सन्मान जीवन गौरव पुरस्कार जाहीर

  • लातूर( दिलीप आदमाने ) – सम्यक समाज संघातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी राष्ट्रीय संविधान सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सम्यक समाज संघ मागील एक वर्षापासून विविध सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करीत आहे त्याचाच एक भाग म्हणून समाज संघातर्फे संविधानाला बळ देत सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्याबद्दल स्मृतीशेष ॲड.एकनाथ आव्हाड आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल डॉ. प्रदीप आगलावे (नागपूर) आणि प्रा.प्रदीप रोडे (बीड) यांना राष्ट्रीय संविधान सन्मान जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती सम्यक संघाचे प्रमुख प्रवक्ते डॉ.सुरेश वाघमारे यांनी दिली आहे.
    यासोबतच राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील कार्याबद्दल उत्तम खंदारे (पूर्णा) जि. परभणी, शासकीय सेवेत राहूनही शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल प्रा.उत्तम कांबळे,रोहिदास मादळे (माजी डेप्युटी जनरल मॅनेजर,भा.स.नि.लि.नांदेड), अविनाश देवसटवार (प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग, लातूर), डी.आय. गायकवाड (माजी साखर संचालक, पुणे), अशोक मानकर (माजी उपायुक्त, महिला बालकल्याण, ठाणे) तसेच सामाजिक व शैक्षणिक विशेषत: बालकल्याणाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या कलापंढरी संस्थेची निवड करून या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बी.पी. सूर्यवंशी,आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक कार्यासाठी झोकून देऊन सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते शरद झरे (औसा), सविता कुलकर्णी (लातूर), भीमराव भवरे (यवतमाळ) आणि यावर्षीचा उत्कृष्ट पत्रकारितेचा विशेष पुरस्कार दैनिक एकमतचे वरिष्ठ संपादक इजाज शेख आदि सर्वाना राष्ट्रीय संविधान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
    हा राष्ट्रीय संविधान पुरस्कार वितरण समारंभ २६ नोव्हेंबर संविधान गौरव दिनी भालचंद्र ब्लड बँक सभागृह,मुख्य बसस्थानक,लातूर येथे रविवार दि. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी स. ११.०० वा. आयोजित करण्यात आला आहे.
    या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सम्यक समाज संघाचे अध्यक्ष ॲड.मंचकराव डोणे, प्रवक्ते डॉ.सुरेश वाघमारे, सचिव डॉ.बाळासाहेब गोडबोले,कोषाध्यक्ष प्राचार्य डॉ.संजय गवई, संघटक अनिल म्हमाने (कोल्हापूर) उपाध्यक्ष डॉ. वेदप्रकाश मलवाडे, प्राचार्य डॉ.संजय वाघमारे, प्रमुख सल्लागार डॉ.पी. जी. जोगदंड (मुंबई विद्यापीठ), बी. एम. कांबळे (माजी अप्पर जिल्हाधिकारी, नांदेड), संजयकुमार कांबळे (सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे आणि माजी प्राचार्य डॉ.पी.एन. सगर यांनी केले आहे.
error: Content is protected !!